राजकीय

नगरसेवक बाबासाहेब त्रिभुवन यांचा प्रशासनाकडे यशस्वी पाठपुरावा

*आमदार लक्ष्मण जगताप यांच्या सुचनेनंतर तांबे शाळेकडे जाणाऱ्या रस्त्याचे डांबरीकरण तात्काळ पूर्ण करा
मागील अनेक वर्षांपासून रखडलेला प्रभाग क्रमांक २७मधील तांबे शाळेकडे जाणारा रस्त्याचे डांबरीकरण व रुंदीकरणाचे काम आमदार लक्ष्मण जगताप यांच्या सूचनेनंतर व नगरसेवक बाबासाहेब त्रिभुवन यांच्या पाठपुराव्यामुळे अखेर पूर्ण झाले आहे.
सदर रस्त्याचे काम अनेक अडचणींमुळे रखडलेल्या अवस्थेत होते. या मार्गावर शिवगणेश कॉलनी, शिवराज कॉलनी, ज्ञानगंगा सोसायटी, नम्रता क्रिस्टल पार्क सोसायटी, वर्धमान अंगण सोसायटी, श्री दत्त कॉलनी, बल्लाळेश्वर सोसायटी, श्री अपार्टमेंट अशा विविध सोसायटी व कॉलन्या मिळून जवळपास ७०० ते ८०० कुटुंब वास्तव्यास आहेत. रस्त्याच्या दुरावस्थेमुळे त्यांना अनेक समस्या व अपघातांना सामोरे जावे लागत होते.
अखेर येथील रहिवाशांनी एकत्र येऊन आमदार लक्ष्मण जगताप यांची भेट घेऊन त्यांच्याकडे आपली अडचण मांडली. त्यानंतर जगताप यांनी या रस्त्याचे काम कोणत्याही परिस्थितीत लवकरात लवकर पूर्ण करण्याच्या सूचना नगरसेवक त्रिभुवन यांना दिल्या.
आमदार जगताप यांच्या सूचना आणि मार्गदर्शनानुसार नगरसेवक त्रिभुवन यांनी परिसरातील नागरिकांशी तात्काळ चर्चा करून व महापालिका अधिकाऱ्यांशी संपर्क साधून सदर कामासंदर्भात चर्चा केली. यावेळी सामाजिक कार्यकर्ते गणेश नखाते उपस्थित होते. त्यानंतर तातडीने या रस्त्याच्या कामाचा शुभारंभ होऊन हे काम तात्काळ पूर्ण करण्यात आल्याची माहिती नगरसेवक त्रिभुवन यांनी यावेळी दिली आहे.
दरम्यान, या कामासाठी तांबे शाळेचे संस्थापक विष्णू तांबे सर यांचे विशेष सहकार्य लाभले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!