राजकीय

भक्ती शक्ती समुहशिल्पा जवळ सार्वजनिक शौचालय व जेष्ठांना आसन व्यवस्था लवकरात लवकर प्रलंबीत मागणीचा पुनरुच्चार करावा. भाई. विशाल जाधव

“भक्ती शक्ती समुहशिल्पा जवळ सार्वजनिक शौचालय व जेष्ठांना आसन व्यवस्था लवकरात लवकर प्रलंबीत मागणीचा पुनरुच्चार करावा.” विशाल जाधव युवाप्रदेशाध्यक्ष व सोमनाथ शेळके जिल्हाध्यक्ष बारा बलुतेदार महासंघ, पुणे जिल्हा यांनी दिले निवेदन व मागणी
बारा बलुतेदार महासंघाचे पदाधिकारी दि.02/02/2022 रोजी संतश्रेष्ठ जगद्गुरु संत तुकाराम महाराजांच्या जयंती निमित्त निगडी येथील भक्ती शक्ती समूह शिल्पाचे दर्शन व संत तुकाराम महाराजांना अभिवादन करण्यासाठी गेले असता जाताना अंतर्गत रस्त्याची दुरावस्था झालेली पहावयास मिळाली.काही ठिकाणी फर्शीच्या जॉईंट मधील सिमेंट निघालेले तर काही फरश्या निम्म्या तुटलेल्या अवस्थेत दिसल्या.
आणि अती संवेनशील बाब म्हणजे या परिसरात अनेक पर्यटक विशेष म्हणजे महीला ,मुले व ज्येष्ठ नागरिक येत असतात त्यांच्यासाठी शौचालय/ मुतारी याची सोय नाही त्यामुळे बारा बलुतेदार महासंघाचे श्री. विशाल जाधव (युवाप्रदेशाध्यक्ष बाराबलुतेदार महासंघ महाराष्ट्र ) , श्री. सोमनाथ तुकाराम शेळके (पुणे जिल्हा अध्यक्ष), श्री संतोष अशोक कुमावत ( सचिव पिंपरी चिंचवड ), सौ. संध्या संतोष कुमावत (महीला अध्यक्ष मावळ तालुका ),श्री.गणेशजी ढाकणे ( पुणे जिल्हा अध्यक्ष भगवान बाबा महासंघ )यांनी आज दि.04/04/2022 रोजी मा. महापौर माई ढोरे व मा. आयुक्त साहेब श्री. विजय पाटील साहेब (पिंपरी चिंचवड) यांना सदर दुरुस्ती व स्वच्छ्तागृहाची सोय करण्याचे आदेश संबंधित अधिकाऱ्यांना देण्यात यावे यासाठी निवेदन दिले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!