सामाजिक

संगीतप्रेमीचं भावविश्व समृद्ध करणारा दैवी स्वर आज अखेर शांत झाला :स्वीकृत सदस्य नवनाथ नढे

प्रतिनिधी (महावीर जाधव)
काळेवाडी:-भारतरत्न ,
स्वरसम्राज्ञी लता दीदी मंगेशकर यांच आज वयाच्या 93 व्या वर्षी मुंबईतील ब्रीच कॅडी रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला .आज पिंपरी चिंचवड शहरातील काळेवाडी विभागात विष्णूराज भजनी मंडळ व ‘ड’प्रभाग माजी स्वीकृत सदस्य मनपा,मा. नवनाथ दादा नढे
पाटील व शिवशाही महिला बचत गट अध्यक्ष मोनिका नढे
पाटील यांच्या वतीने विठ्ठल रुक्मिणी मंदिर परिसर काळेवाडी येथे भारतरत्न, गानकोकिळा लता दीदी मंगेशकर यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी लता दीदी च्या फोटोला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले, अभिवादन वेळी सर्व मान्यवरांनी अभिवादन केले ,मौन धारण करून सर्व उपस्थित मान्यवरांनी भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली. यावेळी नवनाथ दादा नढे
पाटील म्हणाले ,की आज लतादीदी मंगेशकर जरी आपल्यात नसतील तरी त्यांचा आवाज कायम आपल्यासोबत राहणार आहे ,लतादीदींनीना संगीत व गायन क्षेत्रात त्यांना अनेक सन्मान मिळाले आहेत, संगीत क्षेत्राला त्यांनी दिलेले योगदान कित्येक पिढ्यांना प्रेरणा आणि ऊर्जा देत राहील असे बोलून त्याने श्रद्धांजली अर्पण केली ,या वेळी नवनाथ दादा नढे पाटील ,बजरंग नढे,संदीप तांबे ,अनिकेत शिंदे, करण नढे,तुषार पवार ,वसंत कराड ,प्रमोद नढे पाटील ,जयगुरु माहूलकर, कोंडीबा सरपाते सौ.मोनिका नवनाथ नढे,वर्षा पाटील, निर्मला वाघमारे, सुश्मिता शिंदे ,प्रतिभा कलमाने ,लताताई जाधव, अर्चना लिमकर ,ज्योती लोटे, अनिता मुळे, इत्यादी मान्यवर व भनागरिक उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!