Uncategorized

माता रमाईंचे विचार आत्मसात करा – मनिषा ताई घुले . श्री गणेश महिला बचत गटाच्या माध्यमातून रमाई जयंती साजरीकेज

कार्यकारी संपादक (दत्तात्रय मुजमुले)

केज शहरातील श्री गणेश महिला बचत गटाच्या वतीने त्यागमूर्ती माता रमाई यांची जयंती बचत गटाच्या महिलांच्या माध्यमातून साजरी करण्यात आली. शहरातील वकीलवाडी भागात चालत असलेल्या महिला बचत गटाच्या माध्यमातून रमाई माता जयंतीचे आयोजन करण्यात आले होते.कार्यक्रमाची सुरवात माता रमाई यांच्या प्रतिमा पूजनाने करण्यात आली.कार्यक्रमास अध्यक्षा म्हणून नवचेतना सर्वांगीण विकास केंद्राच्या संचालिका सौ मनिषा ताई घुले होत्या तर प्रमुख पाहुणे म्हणून रीपाई चे तालुकाध्यक्ष दीपक कांबळे,पुरोगामी पत्रकार संघाचे नवनिर्वाचित अध्यक्ष रंजीत घाडगे, नवचेतणा चे सीईओ महादेव जोगदंड,पत्रकार दत्तात्रय मुजमुले,श्री.लोंढे सर होते.कार्यक्रमाप्रसंगी मनिषा ताई घुले यांनी सांगितले की जयंती साजरी केली म्हणजे सर्व काही झाले असे नसून आपण महामानवांचे विचार आत्मसात करायला हवेत.माता रमाई यांचा त्याग आपण सर्व महिलांनी लक्षात घ्यावा.आपण ही जीवनात समजूतदार पणा अंगिकारावा.महिलांनी बचत गटाच्या माध्यमातून स्वतः च्या पायावर उभे राहण्याचा व्यवसाय उभारण्याचा प्रयत्न करावा त्यासाठी प्रयत्न केला पाहिजे.भविष्यातील अडचणींवर मात करण्यासाठी स्वतः सिद्ध करा,आणि निर्भर व्हा.आत्मसन्मानाने जगण्यासाठी नवचेतनाच्या माध्यमातून नवचेतना परिवार आपल्या सोबत आहे असे आश्वासन यावेळी महिला बचत गटाच्या महिलांना बोलताना मनिषा ताई घुले यांनी दिले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अनिल बापू वैरागे यांनी तर आभारप्रदर्शन प्रा.सरवदे सर यांनी केले.कार्यक्रमास श्री.गणेश महिला बचत गटाच्या महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!