सौंदना येथे शॉर्ट सर्किटमुळे जळालेल्या ऊसाची महावितरणने शेतकऱ्यांना भरपाई द्यावी- प्रवीण खोडसे

सौंदना येथे शॉर्ट सर्किटमुळे जळालेल्या ऊसाची महावितरणने शेतकऱ्यांना भरपाई द्यावी- प्रवीण खोडसे
केज- दत्तात्रय मुजमुले
तालुक्यातील अनेक ठिकाणी ऊस जळल्याच्या घटना घडत असतानाच सौंदना येथे तर चक्क 30 ते 35 शेतकऱ्यांचा शेकडो एकर ऊस महावितरण च्या गलथान कारभारामुळे जळून खाक झाला आहे.
एकीकडे ऊस तोडणीला येऊनही कारखाने ऊस तोडणी साठी विलंब करत आहेत.दरवर्षी पेक्षा या वर्षी ऊस पिकांचे क्षेत्र वाढलेले आहेत त्यातच या वर्षी साखर कारखाने उशिरा सुरू झाल्याने आणि त्यामुळे अतिरिक्त ऊसाचा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे.अनेक गावांनी शेकडो एकर ऊस अजून जशाच तसा उभा आहे त्यामुळे शेतकरी हवालदिल झाले आहेत.ऊस जातो की नाही याची चिंता वाढली असतानाच महावितरण च्या गलथान कारभारामुळे अनेक ठिकाणी ऊस जळण्याच्या घटना घडत आहेत.
सौंदना येथे शॉर्ट सर्किटमुळे लागलेल्या आगीत ज्या शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे.त्याची महावितरणने जबाबदारी घेऊन शेतकऱ्यांना त्याची नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी मांजरा विकास प्रतिष्ठानचे अध्यक्ष तथा युवक काँग्रेस चे नेते प्रवीण खोडसे यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितले.