सामाजिक

*ऑटोचालक व मालक संघटनेच्या वतीने दरवर्षी प्रमाणे याहीवर्षी स्वामी रामानंद तीर्थ ग्रामीण रुग्णालय परिसरात मोफत पिण्याचे पाणी*

*ऑटोचालक व मालक संघटनेच्या वतीने दरवर्षी प्रमाणे याहीवर्षी स्वामी रामानंद तीर्थ ग्रामीण रुग्णालय परिसरात मोफत पिण्याचे पाणी*

*पोलिस निरीक्षक बाळासाहेब पवार यांच्या हस्ते शुभारंभ*

अंबाजोगाई :- दत्तात्रय मुजमुले

अंबाजोगाई येथील स्वामी रामानंद तीर्थ ग्रामीण रुग्णालयात अनेक वेगवेगळ्या जिल्ह्यातुन येणाऱ्या रुग्णांना त्यांच्या नातेवाईकांना रुग्णालयात पिण्याचे पाण्याची सोय नसल्यामुळे रुग्णांना पाण्यासाठी पाणी विकत घ्यावे लागते ग्रामीण भागातुन येणाऱ्या रुग्णांची परिस्थिती नसल्याने हे रुग्ण त्यांचे नातेवाईक रुग्णालय आतील किंवा बाहेरील हाॅटेलचा आधार घेतात उन्हाचा तडाखा दिवसभर जाणवत असल्यामुळे रस्त्यावर जाणाऱ्या अबालवृद्ध महिला व वयस्कर व्यक्तीना तहाण लागल्यास हाॅटेलांचा आधार न घेता सामाजिक बांधिलकीतुन रुग्ण-नातेवाईकांना , नागरिकांना थंडगार पाणी मिळावे या हेतुने रुग्णालय बाहेरील चौकात अॅटो चालक व मालक संघटनेच्या वतीने मोफत पिण्याचे पाण्याची अंबाजोगाई शहर पोलिस निरीक्षक बाळासाहेब पवार साहेबांना शाळ, पुष्पगुच्छ देवुन हस्ते शुभारंभ करण्यात आला यावेळी सामाजिक कार्यकर्ते न्यामत भाई पठाण,जहिर भाई पठाण,ए आय एम आय एम पक्षाचे बीड जिल्हा प्रवक्ता शेख रमीज सर, प्रहार जनशक्ती पक्षाचे बीड जिल्हा संघटक जहांगीर पठाण,ए आय एम आय एम पक्षाचे अंबाजोगाई शहर अध्यक्ष हिफाजत पठाण, अन्याय अत्याचार भ्रष्टाचार विरोधी समितीचे मराठवाडा संपर्क प्रमुख मोहंमद ताहेर, ऑटोचालक व मालक संघटनेचे अध्यक्ष माजेद भाई पठाण, पत्रकार उमेशजी शिंदे,हाशम भाई,निजाम भाई, पत्रकार शेख फेरोज, पत्रकार मुकरम पठाण,मुद्दसर भाई, ऑटोचालक व मालक संघटनेचे उपाध्यक्ष नय्युम भाई,अज्जु भाई, जोगदंड भाऊ व ऑटोचालक मालक आदींसह नागरिक उपस्थितीत होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!