राजकीय
केज विधानसभा मतदार संघाच्या संभाव्य यादीत पृथ्वीराज साठेंचे नाव आघाडीवर

निष्ठावंत साठेनांच उमेदवारी फायनल असल्याची जनमानसात चर्चा
केज :- विधानसभा निवडणुकीची घोषणा झाली आहे. दोन्ही आघाड्यांचं जागावाटप अंतिम टप्प्यात आहे. अशातच कोणत्या मतदारसंघातून कोण निवडणूक लढणार? याची राजकीय वर्तुळात चर्चा होत आहे. राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या उमेदवारांची संभाव्य यादी बाहेर आली आहे राष्ट्रवादी काँग्रेस (श.प.) गटाची संभाव्य यादी समोर आली असून त्यात केज विधानसभा मतदार संघातून माजी आमदार पृथ्वीराज साठे यांचे नाव आघाडीवर असल्याची माहिती समोर येत आहे.
पृथ्वीराज साठे हे सक्रिय राजकारणात असून ते अनेक वर्षापासून शरद पवारांशी एकनिष्ठ आहेत.तर पक्षांच्या आदला बादलीत अनेक जण पवारांना सोडून गेले मात्र पृथ्वीराज साठे हे एकनिष्ठ राहिले होते.येत्या दोन दिवसांत पक्षाची अधिकृत यादी समोर आल्यानंतर फायनल उमेदवारांची अधिकृत घोषणा होईल.