राजकीय

केज विधानसभेचे इच्छुक उमेदवार रमेश तात्या गालफाडे यांचा निर्णय ठरला ;उद्या भूमिका मांडणार

केज :- विधानसभा निवडणुकीची घोषणा झाली आहे. महाविकास आघाडी आणि महायुतीचे 288 विधानसभेच्या जागांचे जागावाटप अंतिम टप्प्यात आहे.तर काही जागांची महायुतीकडून यादीही आज जाहीर करण्यात आली.अशातच कोणत्या मतदारसंघातून कोण निवडणूक लढणार? याची राजकीय वर्तुळात चर्चा होत आहे.

त्यातच केज विधानसभेसाठी इच्छुक असलेले रमेश तात्या गालफाडे हे दिनांक 21 ऑक्टोबर रोजी केज येथे आपली भूमिका कार्यकर्त्यांसमवेत जाहीर करणार आहेत. इच्छुक उमेदवार रमेश तात्या गालफाडे हे पूर्ण ताकतीने विधानसभेच्या रिंगणात उतरलेले आहेत.अल्पावधीतच रमेश तात्या गालफाडे यांनी कार्यकर्त्याचे जाळे निर्माण करून विधानसभेचे रणशिंग फुंकले होते.तसा मतदार संघात त्यांनी प्रचार प्रसार केलेला आहे. केज विधानसभा मतदार संघात सर्व सामान्यांचा आवाज दाबला जातोय त्या अन्यायाविरुद्ध वाचा फोडण्यासाठी,नागरीकांना न्याय मिळवून देण्यासाठी मी लढत आहे असे रमेश तात्या गालफाडे सांगत आले आहे.

दिनांक 21 ऑक्टोबर रोजी ते काय भूमिका घेणार आहेत ? लढणार की थांबनार ? अथवा सावता सुभा उभा करणार ?याकडे पूर्ण मतदार संघाचे लक्ष लागले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!