तर पुढाऱ्यांना गावा-गावात प्रवेश बंदी करणार-कुलदीप करपे

रस्त्याच्या प्रश्नावर स्वाभिमानीच्या शेतकऱ्यांचा भर पावसात रस्ता रोको
केज :- दत्तात्रय मुजमुले
तालुक्यातील अत्यंत दुरावस्था झालेल्या विविध रस्त्यांच्या मागण्यांसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने जिल्हाध्यक्ष कुलदीप करपे यांच्या नेतृत्वाखाली छत्रपती शिवाजी महाराज चौकात तब्बल 1 तास रास्तारोको आंदोलन करण्यात आले.केज तालुक्यातील खालील नमूद प्रमुख ग्रामीण रस्ते गेल्या 12 वर्षांपासून प्रचंड मोठे खड्डे पडून अतिशय खराब झाले आहेत या रस्त्यांना तात्काळ प्रशासकीय मंजुरी देऊन तात्काळ नव्याने काम चालू करणे गरजेचे आहे.
तरी देखील सदर रस्ते नव्याने करण्यासंबंधी कोणत्याही प्रकारची कारवाई संबंधित विभागाने केली नाही परिणामी नमूद मार्गावरील गावांतील नागरिक , शेतकरी , अबालवृद्ध , गर्भवती महिला , रुग्ण , विद्यार्थी वाहनधारक , आदी नागरिकांचा दररोज जीवघेणा प्रवास होत असून सदया पावसाळ्यात रस्ते अत्यंत चिखलमय होऊन त्यावरून वर्दळ , प्रवास करणे धोकादायक आहे . काही रस्त्यावरील पूल , संरक्षण भिंती सप्टेंबर 2021 मधिल मुसळधार अतिवृष्टीने वाहून गेलेत . सदर रस्ता कामे तात्काळ करणे अत्यंत गरजेचे आहे .
निवेदनात नमूद केज तालुक्यातील ग्रामीण भागात गेल्या 12 वर्षापासून प्रशासनाच्या व लोकप्रतिनिधी च्या जाणीवपूर्वक दुर्लक्षामुळे प्रमुख रस्ते मोठ – मोठे खड्डे पडून अतिशय खराब झाले आहेत . जवळवन , आवसगाव , बोरीसावरगाव ( पावनधाम ) , सावळेश्वर , उमरी , उमरी रोड केज या गावातील प्रमुख रस्ते मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतून मंजूर झाली होती मात्र कोरोना महामारी रोगप्रतिबंधक उपाय करणेसाठी सदर रस्त्याचा निधि वळवून घेतल्याने रद्द झालेत . सदर रस्ते तात्काळ मंजूर करण्याच्या
प्रमुख मागण्यांसाठी आज दि.9 ऑगस्ट 20022 (ऑगस्ट क्रांतिदिनी )केज येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकात स्वाभिमानी शेतकरी संघटना जिल्हाध्यक्ष कुलदीप करपे यांचे नेतृत्वाखाली एक तास रास्ता रोको आदोलन करण्यात आले.परिणामी बीड -लातूर खामगाव-सांगोला महामार्गावरील वाहतूक ठप्प झाली होती. रास्ता रोको आंदोलनास केज संघर्ष विकास समितीचे हनुमंत भोसले,पत्रकार डॉ. हनुमंत सौदागर राष्ट्रवादी काँग्रेसचे नगरसेवक बाळू गाढवे यांनी पाठिंबा दिला.
आंदोलनात स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष कुलदीप करपे, नगरसेवक ओमप्रकाश रांजणकर,जि.उपाध्यक्ष प्रमोद पांचाळ, तालुकाध्यक्ष अमोल थोरात, युवा आघाडी तालुकाध्यक्ष अतुल गवळी, उपाध्यक्ष किरण चाळक,सचीन गिराम, चंद्रकांत अंबाड,सुग्रीव करपे सरपंच शिवाजी शिंपले, उपसरपंच प्रमोद करपे ,उपसरपंच संजय अंबाड,बबन अंबाड,संदीप करपे, अंबादास करपे, मनोहर भैरट, शंकर भैरट, संदिप भाकरे,प्रदीप घुमरे, लहू गायकवाड ,गोविंद करपे ,दत्ता अंबाड,बालासाहेब रंदवे,अशोक
रंदवे,सुनील करपे, दत्ता करपे,शिवाजी भाकरे, मुकुंद करपे ,मनोहर करपे, चंद्रकांत करपे ,रामराव बिक्कड आदि पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.
यावेळी मोठा पोलिस बदोबस्त करण्यात आला होता.
चौकट
15 ऑगस्ट पर्यंत निवेदनातील रस्ते मंजूर केले नाहीतर सर्वच गावा-गावात प्रस्थापित पक्षाच्या पुढाऱ्यांना प्रवेश बंदी करण्यात येईल-
श्री.कुलदीप करपे
जिल्हाध्यक्ष
स्वाभिमानी शेतकरी संघटना बीड जिल्हा