भालगाव-1 येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचे एम. टी.एस परीक्षेत घवघवीत यश

केज :- दत्तात्रय मुजमुले
तालुक्यातील भालगांव- 1येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचे 22 मे 2022 रोजी घेण्यात आलेल्या एम.टी.एस ऑलिम्पियाड परीक्षेत जि.प.प्रा.शाळा भालगांव -1 येथील विद्यार्थ्यांनी घवघवीत यश संपादन करण्यात आले आहे.
याबाबद सविस्तर वृत्त असे की,शालेय विद्यार्थ्यांना स्पर्धा परिक्षेची माहिती व्हावी त्यांना सर्व विषयाचे ज्ञान आत्मसात व्हावे व मुलांमधील स्पर्धा परीक्षेची भीती कमी व्हावी यासाठी विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात येते.त्यापैकी एक म्हणजे एम.टी.एस ऑलिम्पियाड परीक्षा.या परीक्षेत भालगांव- 1येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या विद्यार्थ्यांनी बाजी मारली आहे.यात इयत्ता पहिलीत कु.विभूते जानती अण्णासाहेबाला हिने 97.33 % गुण मिळवून सहावा येण्याचा मान मिळवला आहे.कु . मिटकरी कृष्णिका शरण इयत्ता पहिली हीने 70.68 % गुण मिळवले आहेत.तर 24 एप्रिल 2020 रोजी घेण्यात आलेल्या एम.टी.एस परीक्षेत कु .शिंदे वैष्णवी सतिश इयत्ता 4थी , कु .ढोबळे प्राची युवराज इयत्ता व चि . ढोबळे प्रसाद दीपक इयत्ता 3 री हे विद्यार्थी परीक्षा उत्तीर्ण झाले आहेत.
परिक्षेत उत्तीर्ण झालेल्या सर्व विद्यार्थ्यांचा सेवा सहकारी सोसायटी भालगांव- 1 चे चेअरमन अंकुश मोरे यांच्या हस्ते गुणपत्रक व ट्रॉफी देऊन सत्कार करण्यात आला.सर्व यशस्वी विद्यार्थ्यांना शाळेच्या शिक्षिका श्रीमती बावसकर मॅडम मार्गदर्शन लाभले त्यांनी विद्यार्थ्यांकडून परीक्षेची तयारी करून घेण्यासाठी मेहनत घेतली त्याबद्दल त्यांचे सर्व पालक,सरपंच व ग्रामस्थ यांच्या वतीने सत्कार करून कौतुक करण्यात आले.
यावेळी सरपंच क्रांती ढोबळे,युवराज ढोबळे,चेरमन अंकुशदादा मोरे,शंकर मोरे,विलास गोकुळ,अब्दुल शेख, श्रीम. गिरी मॅडम, माजी मुख्याध्यापक विष्णू बचुटे, बालासाहेब मोरे,आमिन पठाण यांच्यासह गावातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.