Uncategorized

पिडितेला न्याय मिळवून देण्यासाठी दलित अन्याय अत्याचार निर्मूलन समिती उतरणार रस्त्यावर..!

केज /प्रतिनिधी

केज तहसील कार्यालयासमोर दि.३० ऑगस्ट पासून तालुक्यातील पीडित महिला तिच्या वयोवृद्ध आई-वडील आणि लहान मुलीसह गेल्या पाच दिवसापासून उपोषणास बसली असून सदरील पीडित महिलेला प्रशासनाने कसल्याच प्रकारचा न्याय न दिल्यामुळे केज तालुका दलित अन्याय अत्याचार निर्मूलन समितीने पाठिंबा दर्शविला आहे.

याबाबत माहिती अशी की, तालुक्यातील एका गावातील पीडितेवर आत्याचार झाल्याची तक्रार केज पोलीस ठाण्यात दाखल केलेली असून सदरील प्रकरणातील आरोपीला अद्यापही अटक झालेली नाही. म्हणून पीडित महिला तिच्या लहान मुलासह आणि आई वडिलांस गेल्या पाच दिवसापासून उपोषणास बसली असून तिच्या वय वृद्ध आई-वडिलांची तब्येत खालवत चालली आहे. तरीही परंतु प्रशासनाने न्याय दिला नसल्याने केज तालुका दलित अन्याय अत्याचार निर्मूलन समितीने तहसीलदार केज यांना लेखी निवेदन दिले आहे. सदरील निवेदनात म्हटले आहे की, सदरील प्रकरणातील आरोपीला दोन दिवसात अटक झाली नाही तर बहुजन समाज रस्त्यावर उतरून लोकशाही मार्गाने तीव्र स्वरूपाचे आंदोलन करण्यात येईल असा इशारा दिला आहे.

निवेदनावर दलित अन्याय अत्याचार निर्मूलन समितीचे तालुका अध्यक्ष रोहित कसबे, उपाध्यक्ष सुदेश दादा शिरसट, सचिव सुमित बप्पा शिंदे, सहसचिव अशोक गायकवाड, कोषाध्यक्ष योगेश भाई गायकवाड, सहकोषाध्यक्ष लखन हजारे यांनी सह्या आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!