उद्या कळंब येथे होणाऱ्या मराठा आरक्षणाच्या मोर्चात मोठ्या संख्येने सहभागी व्हावे :- शिवाजी ठोंबरे

बीड :- दत्तात्रय मुजमुले
मराठा समाजाला आरक्षण मिळावे ह्या मुख्य मागणीसाठी उद्या कळंब येथे मराठा समाजाच्या वतीने ऐतिहासिक मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे.
मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी आजवर अनेकांनी आपले बलिदान दिले आहे.सद्य परिस्थितीत मराठा समाजाला आरक्षणाची गरज आहे.पूर्वीच्या काळी जमिनीचे प्रमाण जास्त होते मात्र आज त्याच जमिनीचे गुंट्यात रूपांतर झाले आहे.काही तर भूमिहीन झाले आहेत.त्यामुळे आर्थिक परिस्थिती खालावलेली आहे.विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी,नोकरीसाठी आणि समाजाच्या प्रगतीसाठी सुख सौलतीसाठी मराठा समाजाला आरक्षण मिळणे काळाची गरज आहे.त्यासाठी सकल मराठा समाजाच्या वतीने राज्यभर आंदोलन मोर्चे काढण्यात आली आहेत.त्याचाच एक भाग म्हणून उस्मानाबाद जिल्हातील कळंब येथे सकल मराठा समाजाच्या वतीने उपविभागीय अधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात येणार आहे.या मोर्चात बीड जिल्ह्यातील सकल मराठा समाजाने लाखोंच्या संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन छावा मराठा संघटनेचे जिल्हाप्रमुख शिवाजी दादा ठोंबरे यांनी केले आहे.
या ऐतिहासिक मोर्चात शिस्तीत,कोणताही अडथळा,गडबड,गोंधळ न करता आणि समन्वयक ज्या सूचना करतील त्याचे पालन करत सहभागी व्हावे. केज तालुक्यातून जाणाऱ्या वाहनांची व्यवस्था बायपास रोडला करण्यात आली आहे.