रोटरी क्लब केजने घेतलेल्या नृत्य स्पर्धेचे निकाल जाहीर

केज:- दत्तात्रय मुजमुले
शहरांमध्ये नवरात्र उत्सवानिमित्त भवानी माता मंदिराच्या प्रांगणात रोटरी क्लब केज च्या वतीने नृत्य स्पर्धा आयोजित केले होत्या. या नृत्य स्पर्धेमध्ये कु. विदिशा गायकवाड आणि कु.आरोही काकडे यांनी प्रथम क्रमांक तर कु.चेतना काळेनी दुसरा क्रमांक पटकावला. तृतीय क्रमांक कु. गार्गी गवळी आणि ज्योती नेरकर यांनी पठकविला विशेष प्रोत्साहन बक्षीसे कु. गार्गी भोईटे आणि मोरे यांनी पटकावली.या नृत्य स्पर्धेमध्ये शहरातील व परिसरातील ४८ स्पर्धकांनी सहभाग नोंदवला होता. सर्व स्पर्धकांनी खूप सुंदर प्रकारे नृत्याचे सादरीकरण केले.
सदरील नृत्य स्पर्धेचे परीक्षण रो. विकास आप्पा मिरगणे आणि रोख.डी.एस. साखरे यांनी केले.या कार्यक्रमास केज नगरीच्या नगराध्यक्षा तथा रो.मा. अध्यक्षा सीता ताई बनसोड, युवा नेते अमर भैया पाटील, संघर्ष पत्रकार संघाचे अध्यक्ष अनिल गलांडे, प्रा. हनुमंत सौदागर, दिनकर बापू राऊत आणि शहरातील व परिसरातील युवक, नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.दि.१२ ऑक्टोंबर २०२२ रोजी नृत्य स्पर्धेचे बक्षीस वितरण करण्यात येणार आहे. असे केज रोटरी चे संस्थापक हनुमंत भोसले व रोटरी अध्यक्ष पशुपतीनाथ दांगट, सचिव सूर्यकांत चौरे यांनी सांगितले आहे.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी प्रवीण देशपांडे, धनराज पुरी आणि सर्व आजी-माजी रोटरी सदस्य यांनी अथक परिश्रम घेतले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन हनुमंत भोसले सर आणि दादासाहेब जमाले यांनी केले.