राष्ट्रवादीचे नेते बजरंग सोनवणे यांनी केले मांजरा धरणाचे जलपूजन

केज :- दत्तात्रय मुजमुले
बीड , उस्मानाबाद आणि लातूर या तीन जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या जीवनात हरीत क्रांती घडवून आणणारा मांजरा प्रकल्प काठोकाठ भरला आहे . त्याचे जलपूजन राष्ट्रवादीचे नेते बजरंग सोनवणे यांच्या हस्ते करण्यात आले .
याबाबतची माहिती अशी की , केज तालुक्यातील मांजरा नदीवरील मांजरा धरण हे काठोकाठ भरले असून सकाळी त्याचे दोन दरवाजे उघडले आहेत . सलग तीन वर्षे हे धरण पूर्ण क्षमतेने भरल्याने बीड , लातूर , उस्मानाबाद या भागातील ओलिताखाली जमीन असणाऱ्या शेतकऱ्यांचा व ऊस उत्पादक शेतकऱ्यांना याचा फायदा होणार आहे . त्या निमित्त येडेश्वरीचे संस्थापक चेअरमन तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते बजरंग सोनवणे यांनी दि . 16 ऑक्टोबर रोजी दुपारी मांजरा प्रकल्पावर जाऊन जलपूजन केले .
यावेळी त्यांचे सोबत बालासाहेब दादा बोराडे , बाळकृष्ण भवर , गुंडाप्पा भुसारी , पिंटु ठोंबरे , भाऊसाहेब गुंड , बालासाहेब गाढवे , इनामदार , मुस्तफा खुरेशी , युनुस शेख , गोपाळ मस्के , जयचंद धायगुडे , मुकूंद कणसे,विवेक खोडसे यांच्यासह परिसरातील शेतकरी उपस्थित होते .