धन्यवाद मोदिजी अभियान समारोप सोहळा बीड येथे.

धन्यवाद मोदिजी अभियान समारोप सोहळा बीड येथे.
भाजपा कामगार मोर्चा बीड च्या वतीने
धन्यवाद मोदिजी अभियानाचा समारोप सोहळा बीड
शहरात होत आहे, या निमित्त बीड जिल्ह्यातील कामगार वर्गाचे जे प्रश्न आहेत ते सोडवलेले आहेतच पण जे बाकी आहेत ते पण लवकरच सोडवले जातील.
यासाठी बीड जिल्ह्यातील सर्व कामगार बंधू आणि भगिनींनी मंगळवार दि 29/11/2022 रोजी हॉटेल विघ्नहर्ता दुसरा मजला साठे चौक येथे उपस्थित राहावे,असे आवाहन बीड जिल्हाध्यक्ष राजेंद्रजी मस्के साहेब यांच्या सूचनेनुसार
बीड जिल्हा सरचिटणीस दादासाहेब नन्नवरे व ता.अध्यक्ष विलासराव सातपुते यांनी केले आहे.
मा.पंतप्रधान श्री.नरेंद्रजी मोदी साहेब यांची उत्कृष्ट कारकिर्द, देशातील कामगार वर्गासाठी घेतलेले चांगले निर्णय या साठी देशात धन्यवाद मोदी जी अभियान राबविण्यात आले आहे, या अभियानाचा महाराष्ट्र (मराठवाडा) समारोप बीड येथे करण्यात येणार आहे, त्यामुळे सर्व कामगार बंधू भगिनींनी कार्यक्रमास उपस्थित रहावे.
कार्यक्रमास उपस्थित राहणाऱ्या 100 कामगारांचा एक वर्षाचा अपघाती विमा उतरवला जाणार आहे.
श्री.दादासाहेब लक्ष्मण नन्नवरे
जिल्हा सरचिटणीस
या कार्यक्रमास बीडच्या दबंग खासदार प्रितम ताई मुंढे ,बीड जिल्हाध्यक्ष श्री.राजेंद्रजी मस्के,भाजपा कामगार मोर्चा प्रदेशाध्यक्ष श्री.गणेश लक्ष्मणराव ताठे,श्री.जोरले,श्री.संजयजी राठोड,आणि बीड जिल्ह्यातील सर्व पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत.