राष्ट्रीय पुरोगामी पत्रकार संघाची 2023 ची कोर कमिटी लवकरच जाहीर :- विजय सुर्यवंशी

बीड :- दत्तात्रय मुजमुले
पुरोगामी पत्रकार संघाचा वेगाने होणारा विस्तार लक्षात घेता नवनवीन सभासदांच्या कार्यकर्तुत्वाला वाव मिळावा यासाठी संघाची 2023 साठी विस्तारीत कोर कमिटी लवकरच जाहीर होणार आहे. याविषयावर बोलताना संस्थापक अध्यक्ष विजय सुर्यवंशी म्हणाले की, आपण आता आपल्या संघाच्या नुसत्या बैठका घेऊन चालणार नाही तर आपल्याला प्रत्यक्षात कृती करावी लागेल. येणाऱ्या 2023 पासून आपल्याबरोबर येणारे पत्रकार व सामाजिक कार्यकर्ते व समाजातील प्रत्येक वंचित घटक यांना काही ना काही मिळवून देण्याचा संघाचा मानस आहे.
समता स्वातंत्र्य बंधुत्व ही मुलभूत मूल्ये हीच संघाची खरी ओळख आहे.संघाच्या वतीने कोणतेही उपक्रम राबवित असताना,कार्यक्रमाचे पूर्वनियोजन, शिस्तबध्दता, वेळेचे व्यवस्थापन, संघभावना या गोष्टींवर विशेष भर दिला गेला पाहिजे. कोणताही उपक्रम करत असताना तो प्रामाणिकपणे केला पाहिजे. उपक्रम करताना संघभावनेन इतर सभासदांना समजून घेणे आवश्यक आहे. संघातील प्रत्येक सभासदां विषयी आत्मीयता,आस्था आणि समतेची भावना असल्याचे कृतीतून दिसले पाहिजे. संघाच्या जङघङणीत आज मोठ्या प्रमाणावर महिला जोङल्या गेल्या आहेत आणि संघाच्या विस्तारामध्ये महिलांचे मोठे योगदान आहे. आज विविध क्षेत्रातुन महिला संघात कार्यरत असताना त्यांच्याशी सौजन्याने वागणे अपेक्षित आहे. संघातील काहीजण सोशल मिङियावर त्यांच्याशी वैयक्तिक संपर्क साधत नाहक गैरसमज निर्माण करत आहेत. कृपया संघातील महिला सभासदांशी संघविषयक चर्चा फक्त ग्रुपवरच करावी. जे कोणी संघातील महिलांशी असभ्य वर्तूणूक करतील त्यांना तात्काळ सघातून बेदखल केले जाईल याची नोंद घ्यावी. महिलांना सन्मानाची वागणूक दिली गेली पाहिजे. संघाच्या प्रत्येक महिलेला आवश्यक ते सर्व सहकार्य दिले गेले पाहिजे तरच महिला समक्ष होतील.
आनंदाची बाब म्हणजे लवकरच नाशिक जिल्ह्यातील मालेगाव येथील जाटपाडे खेड्यात संघाच्या वतीने उपक्रम सुरू करण्यात येणार आहे. त्यानंतर पुणे शहरात राष्ट्रीय महिला अध्यक्ष सुनीता तोमर व डॉ.पल्लवी मेहरे यांच्या प्रयत्नाने दुसरा उपक्रम सुरू करत आहोत. हे दोन्ही उपक्रम सगळ्यांसाठीच सरप्राईज असणार आहेत.समाजातील प्रत्येक व्यक्तींचा सर्वांगीण विकास होणे व त्याच्या क्षमतांचे संवर्धन होणे गरजेचे आहे. त्याला कौशल्य विकासाची जोड दिली तर ते व्यक्तिमत्त्व अधिक परिपूर्ण बनते. संघातील प्रत्येक सदस्य सातत्याने एकमेेकाला अव्यक्त प्रोत्साहन देण्याचे काम करत असतोच. संघाच्या वाटचालीमध्ये सभासदांसह अनेक ज्ञात अज्ञात लोकांचा, प्रत्यक्ष अप्रत्यक्ष सहभाग असतो, योगदान असते. यामुळे आपण संर्वानी संघाचा इतिहास समजून घेणे सर्वात महत्त्वाचे आहे. संघाची ध्येये, उद्दिष्टे, मूल्ये ही वेगवेगळ्या व्यक्तींच्या प्रत्यक्ष अप्रत्यक्ष योगदानातून विकसित होत असतात. संघाच्या वाटचालीत आणि विस्तारात अनेक सभासदांचे योगदान आहे. या सभासदांनी अंगीकारलेली मूल्ये, विचार व तत्त्वे समजून घेणे हेही महत्वाचे आहे.असे सभासद आपल्यासाठी तसेच संघासाठी प्रेरणादायी असतात. पुरोगामी पत्रकार संघाला प्रत्येक जिल्ह्यात नवनवीन उपक्रम उभे करून आपल्या सोबत असणाऱ्या पत्रकार व संबंधित घटकांना आर्थिक दृष्ट्या सक्षम करावयाचे आहे.आपण देखील आपापल्या जिल्ह्यात संघाचे उपक्रम सुरू करण्यासाठी ईच्छुुक असाल तर आमचे मार्गदर्शन नेहमीच राहील.संघाच्या वरिष्ठ पातळीवर काम करण्याची सुवर्णसंधी लवकरच नवीन सदस्यांना मिळणार आहे.
संघाच्या 2023 साठी जाहीर होणार्या कोर कमिटी मध्ये विश्वस्त पदाधिकाऱ्यांबरोबरच पनवेल येथील बैठकीत उपस्थित असणाऱ्या ज्या सभाादांंनी कोर कमिटी मध्ये आपापली नावे दिली आहेत त्यांचाही समावेश ककरण्यात येणार आहे. काही कारणास्तव नविन पनवेल येथील बैठकीस उपस्थित राहू न शकलेल्या सभासदांना देखील कोर कमिटी मध्ये काम करायचे असेल तर आपले नाव जिल्हा राष्ट्रीय सचिव प्रवीण परमार व राष्ट्रीय महासचिव विनोद पवार यांच्याकडे पर्सनल व्हाट्सअप वर पाठवल्यास त्यांचाही विचार केला जाईल असे पुरोगामी पत्रकार संघाचे संस्थापक अध्यक्ष विजय सुर्यवंशी यांनी सांगितले आहे.