राजकीय

माऊली उर्फ किसन भोसले पिंपरी चिंचवड महानगरपालिका पथ विक्रेता निवडणुकीत बहुमताने विजय

पिंपरी चिंचवड – रिपब्लिकन जनशक्ती पिंपरी चिंचवड शहर युवक अध्यक्ष, पत्रकार तसेच हातगाडी पथारी व्यवसायिकांच्या मूलभूत प्रश्नावर सतत झटणारे, गोरगरिबांना रोजगार मिळवण्यासाठी प्रशासनाच्या विरोधात सातत्याने संघर्ष करणारे भटके विमुक्त समाजातील युवक नेतृत्व माऊली उर्फ किसन भोसले यांची पिंपरी चिंचवड महानगरपालिका पथ विक्रेता निवडणुकीमध्ये बहुमताने विजय झाले. या निवडणुकीमध्ये पॅनल प्रमुख काशिनाथ नखाते व रिपब्लिकन जनशक्ती पक्ष अध्यक्ष साहित्यिक अर्जुनराव डांगळे,रिपब्लिकन जनशक्ती महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष शैलेंद्र मोरे यांनी माऊली भोसले यांच्या विजयासाठी पथ विक्रेता सभासदांना आवाहन करून हातगाडी पाथरेवाल्या नागरिकांच्या व्यवसायाला सुरक्षा देऊन त्यांना पिंपरी चिंचवड महानगरपालिकेकडून योग्य ते सुरक्षा व मूलभूत सुविधा मिळाव्या यासाठी झटणारा कार्यकर्ता म्हणून माऊली भोसले यांना विजयी करण्याचे आवाहन करण्यात आले होते. या अहवाला पथ विक्रेता विभागातील हातगाडी पथारी सभासदांनी योग्य उमेदवाराला संधी देऊन त्यांच्या आणि अडचणी मध्ये निश्चित मदत होईल असा विश्वास व्यक्त केलेला आहे याच विश्वासाने माऊली भोसले यांना विजयी करण्यात आल्याचे मतदारांनी सांगितले. पिंपरी चिंचवड महानगरपालिका पथ विक्रेता निवडणुकीत विजय झाल्यानंतर माऊली भोसले यांनी सांगितले की, यापुढे अधिकाधिक होकर झोन तयार करण्यासाठी पिंपरी चिंचवड महापालिकेकडे आगृही भूमिका मांडणार तसेच पथ विक्रेता यांना योग्य ते मूलभूत सुविधा व ऊन पिंपरी चिंचवड महानगरपालिका व शासनाच्या योजनांचा लाभ मिळवून देणार असा त्यांनी विजयानंतर मनोदय व्यक्त केला आहे. शेवटी सर्व मतदारांचे माऊली भोसले यांनी विजय केल्याबद्दल आभार व्यक्त केले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!