राजकीय

केज शहरात मंत्री ना.धनंजय मुंडे यांच्या स्वागतासाठी भर पावसात कार्यकर्त्यांची अलोट गर्दी

केज :- दत्तात्रय मुजमुले

महाराष्ट्र राज्याचे नवनिर्वाचित कॅबीनेट मंत्री ना. धनंजय मुंडे यांची राज्य मंत्रिमंडळात कॅबिनेट मंत्री म्हणून निवड झाल्यानंतर ते प्रथमच बीड जिल्ह्याच्या दौऱ्यावर असताना केज तालुक्याचे राष्ट्रवादीचे नेते तथा येडेश्वरी साखर कारखान्याचे चेअरमन बजरंग बप्पा सोनवणे यांच्या पवनसुत निवासस्थानी सत्काराचे आयोजन केले होते.सदरील सत्कारच्या अनुशंगाने केज तालुक्यातील बजरंग बप्पा सोनवणे यांचे कार्यकर्ते तथा केज तालुक्यातील मतदार मोठ्या संख्येने भर पावसात उपस्थित होते.

मंत्री धनजंय मुंडे यांचे केज शहरात पदार्पण झाल्यानंतर त्यांचे जंगी स्वागत ढोल ताश्यांच्या गजरात तथा असंख्य कार्यकर्त्याच्या उपस्थितीत करण्यात आले. यावेळी बजरंग सोनवणे यांची प्रकृती ठिक नसतानाही केज तालुक्यातून आलेल्या कार्यकर्त्यांच्या भेटी घेतल्या.

मंत्री धनजंय मुंडे यांनी जास्त वेळ न घेता थोडक्यात आपले मनोगत व्यक्त केले व सर्व जनतेचे आभार मानून बजरंग बप्पा सोनवणे यांचेही आभार मानले. शेवटी येडेश्वरी साखर कारखान्याचे सर्वेसर्वा बजरंग सोनवणे यांनी सर्वाचे आभार मानले

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!