Uncategorized

राष्ट्रवादी काँग्रेसच्या जिल्हाध्यक्षपदी आ. संदीपभैय्या क्षीरसागर

बीड/प्रतिनिधी

राष्ट्रवादी-काँग्रेस पक्षाकडून बीड जिल्ह्याध्यक्ष पदाची जबाबदारी आ.संदीप क्षीरसागर यांच्याकडे देण्यात आली आहे.शरदचंद्र पवार साहेब यांचे निष्ठावंत असलेल्या आ. संदीप क्षीरसागर यांची,पक्षकार्यकारिणी कडून जिल्हाध्यक्ष पदावर नियुक्ती करण्यात आली आहे.याबाबत बुधवार (दि.१९) रोजी नियुक्तीपत्र देण्यात आले.

यावर आ.संदीप क्षीरसागर यांनी,माझ्यासारख्या कार्यकर्त्यावर ही महत्त्वाची जबाबदारी दिली आहे त्याबद्दल पक्षाचे सर्वेसर्वा तथा राष्ट्रीय अध्यक्ष खा. शरदचंद्र पवार साहेब, कार्याध्यक्षा खा. सुप्रियाताई सुळे, प्रदेशाध्यक्ष मा.जयंत पाटील साहेब यांचे आभार मानतो. तसेच शिव-शाहू- फुले-आंबेडकर यांच्या विचारांचा वारसा जपण्यासाठी सदैव तत्पर असेल अशी ग्वाही दिली. बीड जिल्हा हा सदैव मा.शरदचंद्रजी पवार साहेबांना मानणारा जिल्हा आहे. बीड जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अधिक मजबूत करण्यासाठी मी कटिबद्ध आहे, असेही आ. संदीप क्षीरसागर यांनी सांगितले आहे.

संदीप क्षीरसागर हे शरद पवारांचे खंदे समर्थक म्हणून ओळखले जातात त्यांचे बीड जिल्ह्यात सर्व प्रथम संत रविदास प्रतिष्ठानचे बीड जिल्हाध्यक्ष बाळासाहेब राऊत यांनी सर्व स्तरातून व कार्यकर्त्यांनी अभिनंदन केले आहे.राष्ट्रवादी काँग्रेसच्या जिल्हाध्यक्षपदी आ. संदीपभैय्या क्षीरसागर

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!