सामाजिक

श्री क्षेत्र देहू भंडारा डोंगर येथे 500 रोपाचे वृक्षारोपण

संतश्रेष्ठ विश्वगुरू जगतगुरु तुकाराम महाराज
मराठवाडा जनविकास संघ ( महा.राज्य ) संचलित मराठवाडा चॅरीटेबल ट्रस्ट एकसंघ समिती,पिंपरीचिंचवड शहर,पुणे व छत्रपती शिवाजी महाराज वनश्री राज्यस्तरीय वृक्षमित्र महाराष्ट्र-राज्य पुरस्कार प्राप्त श्री.अरुण पवार आणि मित्रपरिवार , आदर्श सरपंच, धारूर लोकनियुक्त, धाराशिव जिल्हा तालुका तुळजापूर बालाजी पवार तसेच श्री क्षेत्र भंडारा डोंगर ट्रस्ट देवस्थान समिती देहूगाव व माऊली भक्त यांच्या संयुक्त विद्यमानाने मराठवाडा मुक्तीसंग्राम भारतीय स्वातंत्र्याच्या पुर्णत्वाचा अमृत महोत्सव वर्षा निमित्त ७५०० वृक्ष लागवडीचा संकल्प केलेला आहे.त्याची सुरुवात श्री क्षेत्र भंडारा डोंगर संत तुकाराम जगतगुरू विश्वगुरू संत श्रेष्ठ भंडारा डोंगर पासून ५०० रोपांचे वृक्षारोपण समारंभ रविवार दि. ९ जुलै २०२३ रोजी सकाळी ९. ३० वाजता करण्यात आली . श्री.क्षेत्र भंडारा डोंगर येथे ज्येष्ठ नागरीक संघ, वारकरी संप्रदायातील माता भगिनी ,मराठवाडा भुमिपुत्र यांच्या उपस्थितीत झाडे लावा झाडे जगवा . झाडांना घाला पाणी ते वाढवतील पाऊस पाणी या सुंदर विचारांनी प्रेरित होऊन झाड जेसीबीने खड्डे खाणण्यात आले होते त्या मध्ये लावत होते. निसर्गाच्या संवर्धनासाठी प्रत्येक जण स्वंयप्रेरणेन कार्य करत होता युवकां पासुन ते ज्येष्ठ नागरीकांनी बघता बघता ५०० वृक्षरोप लावले आणि वरुण राजान आशिर्वादरुपी हाजेरी लावली. श्री. संत तुकाराम महाराज मंदिर ,श्री क्षेत्र भंडारा डोंगर येथे महाप्रसाद व दर्शनाचा लाभ सर्वांनी घेतला त्याच बरोबर मंदीराच्या कामाची माहीती ट्रस्टच्या वतीन सर्वांना सांगण्यात आली.
….
उद्योजक मा. श्री. डि. एस.राठोड ,ह.भ.प.श्री.डॉ. गजानन वाव्हळ ,मा. नगरसेवक श्री. आप्पा बागल ,गुणवंत कामगार महाराष्ट्र शासन पती पत्नी श्री. आण्णा जोगदंड ,सौ. संगिता जोगदंड ,श्री. बळीराम माळी ,गुणवंत कामगार पुरस्कार प्राप्त महाराष्ट्र शासन श्री. बाळासाहेब सांळुखे,मराठवाडा मुक्तीसंग्राम अमृत महोत्सव समिती सदस्य महाराष्ट्र शासन श्री. नितीन चिलवंत,मराठवाडा जनविकास संघ सोशल मिडीया मराठवाडाप्रमुख श्री. अमोल लोंढे,भैरवनाथ ज्येष्ठ नागरीक संघ ,भीष्माचार्य ज्येष्ठ नागरीक संघ ,श्री. स्वामी समर्थ महिला मंडळ काशीद पार्क ,वंदे मातरम् संघटना पिंपळे गुरव , आर जे स्पोर्ट अॅकेडेमी नॅशनल खेळाडु श्री. रोहीत जाधव , कॅप्टन प्रमोद अॉग्रें , श्री. पुष्कराज जोशी ,सौ.शुभांगी जोशी , श्री. हनुमंत काशीद ,श्री. मुंजाजी भोजने , ,बुध्दभुषण विहार संस्थापक अध्यक्ष श्री. पुणाजी रोकडे ,वृक्षमित्र श्री. सोमनाथ कोरे , ,श्री. लश्मण कोन्हाळे ,श्री. नागेश जाधव ,श्री. धोडींबा काटे ,सौ. रेखा दुधभाते ,श्री. क्षेत्र भंडारा डोंगर समिती अध्यक्ष मा. श्री. बाळासाहेब काशीद ,सदस्य श्री. जगन्नाथ नाटक पाटील ,सदस्य श्री. गोपाळ पवार ,श्री. रामभाऊ कऱ्ह।ळे ,ह. भ. प. श्री. माऊली मामा ढमाले ,श्री.. अनिल पाटील, श्री. गौतम रोकडे, श्री. रंजीत कानकट्टे आदींनी सहभागी होऊन वृक्षारोपण केले

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!