कौडगाव येथे साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांचा 103 वा जन्मोत्सव विविध सामाजिक उपक्रमांनी होतोय साजरा.

केज :- दत्तात्रय मुजमुले
सत्यशोधक लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचा 103 व्या जयंती उत्सवाचे औचित्य साधून कौडगाव ता-केज येथे समस्त ग्रामस्थांच्या वतीने विविध शालेय स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते सदरील स्पर्धेत सहभागी विद्यार्थ्यांमधील प्रथम,द्वितीय, तृतीय व उत्तेजनार्थ क्रमांकाची निवड करून संबंधित विद्यार्थ्यांना शालेय साहित्यांसह बक्षिस वितरण समारंभ आयोजित करण्यात आला होता .
बक्षिस वितरण समारंभास प्रमुख व्याख्याते म्हणून व्हाइस ऑफ मिडिया चे केज तालुका अध्यक्ष प्राचार्य डॉ हनुमंत सौदागर, दैनिक प्रभास केसरी चे कार्यकारी संपादक पत्रकार दत्ता मुजमुले, भारतीय काॅंग्रेस पक्षाचे केज तालुका अध्यक्ष प्रवीण खोडसे, जेष्ठ शिक्षण विस्तार अधिकारी पंचायत समिती केज च्या श्रीमती. पठाण मॅडम, बनसारोळा केंद्र प्रमुख श्री.बोराडे सर, उपसरपंच बळीराम चाटे, ग्रामपंचायत सदस्य, अभिमान गायकवाड,माजी सरपंच मोहनराव चाटे, सेवा सहकारी सोसायटी बनसारोळा चे माजी संचालक सर्जेराव पवार, ग्रामपंचायत सदस्या श्रीमती. पल्लवी पौळ, श्रीमती. भाग्यशाला पवार , ग्रामपंचायत कार्यालय कर्मचारी श्रीमती. दळवे मॅडम, ग्रामसेवक निलेश पागुरे,शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष शरद पवार,माजी सरपंच रामचंद्र पवार, परसराम पवार, यांच्यासह जयंती उत्सव समिती कौडगाव चे सर्व पदाधिकारी,ग्रामस्थ , विद्यार्थी,व सर्व शिक्षकवृंदासह कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून कौडगांवचे प्रथम नागरिक सरपंच नारायण महाकुंडे हे उपस्थित होते.कार्यक्रमाचे सुत्रसंचलन जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कौडगाव चे मुख्याध्यापक श्री.गोविंद मुळे सर तर प्रस्ताविक पत्रकार नवनाथ पौळ यांनी केले व कार्यक्रमाचा अध्यक्षीय समारोप सरपंच नारायण महाकुंडे करून उपस्थित मान्यवरांचे आभार तानाजी पौळ यांनी मानले.
चौकट – सर्व महापुरूषांनी अफाट कष्ट घेऊन बहुजन समाजाला दलदलीतून बाहेर काढून यासाठी आपलं आयुष्य समर्पित केलं त्याच महापुरूषांचा वसा व वारसा आपण विचारातून व कृतीतून दाखवून देण्यासाठी या जयंती उत्सवाच्या निमित्ताने प्रेरित होऊन विद्यार्थी व पालकांनी प्रेरित होऊन आपला सामाजिक, बौद्धिक व सांस्कृतिक विकास साधण्यासाठी कटिबद्ध असले पाहिजे.पत्रकार नवनाथ पौळ यांच्या मार्गदर्शनाखाली जयंती उत्सव समितीने राबविलेले उपक्रम नक्कीच प्रेरणादायी आहेत ते नक्कीच आजचा चिमुकला विद्यार्थी महापुरूषांच्या विचाराने पेटून उठून उद्याचा कुशल वैचारिक आदर्श नागरिक बनेल यात तिळमात्र शंका नाही.- प्राचार्य डॉ हनुमंत सौदागर(व्हाइस ऑफ मिडिया केज तालुका अध्यक्ष)
चौकट – शिक्षण हे वाघिणीचे दुध आहे जो कोणी प्राशन करील तो गुरगुरल्या शिवाय रहाणार नाही हा बाबासाहेबांचा विचार आपण आत्मसात करून शिक्षण घेतले पाहिजे , शिक्षणाशिवाय समाजाला पर्याय नाही .शिका संघटित व्हा संघर्ष करा हा मुलमंत्र जोपासण्यासाठी लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांनी जग बदल घालुनी गाव सांगुन गेले मज भीमराव ,असे सांगून साहित्य विश्वात क्रांती घडवून आणली त्याच अण्णाभाऊ साठे यांचा १०३वा जन्मोत्सव आज कौडगाव मध्ये ग्रामपंचायत कार्यालय कौडगांव व जयंती उत्सव समिती च्या वतीने साजरा होतोय ते पण विविध शालेय स्पर्धांचे आयोजन करून विद्यार्थ्यांना बक्षिस वितरण करून प्रेरणा देण्याचे होणारे काम खरच कौतुकास्पद आहे.- पत्रकार दत्ता मुजमुले(दैनिक प्रभास केसरी कार्यकारी संपादक)
चौकट- सत्यशोधक लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या १०३व्या जयंती उत्सवाचे औचित्य साधून, विद्यार्थ्यांना महापुरूषांचे विचार समजून उमजावेत यासाठी विद्यार्थ्यांना व शिक्षकांना प्रेरणा देण्याचे काम विविध शालेय स्पर्धांचे आयोजन करून जयंती उत्सव समितीने राबविले खरचं प्रेरणादायी आहे असेच उपक्रम आपण राबवावेत व जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांना प्रेरणा मिळून गावातील विद्यार्थी गावातच शिकला पाहिजे यासाठी सहकार्य करून जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचा दर्जा अधिकाधिक मजबूत करण्यासाठी ग्रामस्थांनी पुढाकार घ्यावा .- श्रीमती पठाण मॅडम(जेष्ठ शिक्षण विस्तार अधिकारी, पंचायत समिती केज