सोनेसांगवी ग्रामपंचायतीचा अभिनव उपक्रम !

केज :- दत्तात्रय मुजमुले
तालुक्यातील सोनेसांगवी ग्रामपंचायतीच्या वतीने दिनांक २५ ऑगस्ट रोजी ग्रामसभा घेण्यात आली.या ग्रामसभेस गावचे सरपंच मुंकुद कनसे यांनी आपला मनोदय सर्व सदस्य व गावातील ग्रामस्थ यांच्या समोर मांडला असता सर्व सदस्य व ग्रामस्थ यांनी तात्काळ होकार दिला आणि तो ठराव तात्काळ मंजुर करण्यात आला.
या बाबत सविस्तर वृत असे की, सोनेसांगवी ग्रामपंचायतचे सरपंच मुकुंद कनसे हे गावासाठी सतत काहीना काही करत असतात.अशीच एक संकल्पना त्यांच्या मनात आली व त्यांनी ग्रामसभेत मांडली की, मुलींचा जन्मदर वाढवण्यासाठी मुलगी जन्माला आल्यास तिच्या नावे ५५०१/- रूपये डिपॉझिट करण्याचा ठराव सोनेसांगवी ग्रामपंचायतीच्या वतीने घेण्यात येत आहे व तसेच दुसरा ठराव सोनेसांगवी गावातील दहावी व बारावीचे विद्यार्थी विद्यार्थीनी केज तालुक्यातुन परिक्षेत पहीला, दुसरा, तिसरा क्रमांक पटकवल्यास त्या विद्यार्थी, विद्याथींनीच्या हस्ते १५ ऑगस्ट रोजी ध्वजारोहण करण्याचा मान देण्यात येईल. हे दोन्ही ठराव सर्वानुमते सदस्य व ग्रामस्थ यांच्या समोर मंजुर करण्यात आले तसेच या सह गावाच्या सर्वांगीन विकासाच्या संदर्भाचे अनेक ठराव घेवुन ग्रामसभा सरपंच मुकुंद कनसे यांच्या अध्यक्षतेखाली शांततेत पार पडली.
सरपंच मुकुंद कनसे यांनी बोलताना सांगितले की, आम्ही राबविलेला उपक्रम तालुक्यातील सर्व ग्रामपंचायतीने राबवा जेणे करुन मुलीचा जन्मदर वाढविण्यासाठी मदत होईल तसेच गावातील विद्यार्थी जिद्दीने अभ्यास करून ध्वजारोहणाचा मान प्राप्त करण्यासाठी प्रयत्न करतील.
यावेळी उपसरपंच राहुल डिकले, सदस्य शामल पांचाळ, सिध्देश्वर साखरे बबर शेख, मिनाताई राऊत, संगीता गालफाडे, कलम यादव व गावातील बहुसंख्य नागरीक उपस्थीत होते सोनेसांगवीचे सरपंच उपसरपंचासह सर्व सदस्य यांचे सर्व स्तरातुन अभिनंदन केले जात आहे शेवटी सर्वाचे आभार ग्रामसेवक महेश वाकळे यांनी मानले