Uncategorizedराजकीय

पिंपरी कॅम्पातील सामाजिक कार्यकर्ते बाळासाहेब शिंदे यांची वरिष्ठ उपाध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी पिंपरी चिंचवड शहर ओबीसी सेल पदी नियुक्ती

पिंपरी ३१ :- राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे माझी पदाधिकारी पिंपरी चिंचवड शहरातील सामाजिक कार्यकर्ते बाळासाहेब उर्फ बंडू शिंदे यांची आज राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी ओबीसी सेल पिंपरी चिंचवड शहर वरिष्ठ उपाध्यक्षपदी नियुक्ती शहराध्यक्ष भाई विशाल जाधव यांच्या हस्ते करण्यात आली. सोबत पिंपरी चिंचवड राष्ट्रवादी युवक काँग्रेस शहराध्यक्ष इम्रान भाई शेख रेल्वे युनियन मजदूर पुणे जिल्हाध्यक्ष संतोष भाऊ कदम उपस्थित होते.
पिंपरी या भागामध्ये गेले पंचवीस वर्ष सक्रिय राजकारणामध्ये सहभाग असणारे बाळासाहेब शिंदे हे पूर्वाश्रमाचे काँग्रेस पक्षाचे पदअधिकारी म्हणून काम पाहिलेला आहे. सध्याच्या राजकारणामध्ये चालू असलेल्या घडामोडीचा विचार करता त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्वेसर्वा माननीय शरदचंद्रजी पवार साहेब व प्रदेशाध्यक्ष जयंतराव पाटील तसेच ओबीसी विभागाचे प्रदेशाध्यक्ष राज साहेब राजापूरकर यांच्या विचाराला अधीन राहून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे धुरा आपल्या खांद्यावर घेण्याची जबाबदारी घेतली येत्या काळामध्ये ओबीसी, एससी, एसटी, एनटी, वीजेएनटी समाजामध्ये त्यांचा दांडगा जनसंपर्क आहे.येत्या काळामध्ये पिंपरी विधानसभेत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा उमेदवार कशाप्रकारे निवडून येईल याच्याकडे जास्त लक्ष देण्याचे काम ते करणार आहेत.

नियुक्तीपत्र देत असताना शहराध्यक्ष भाई विशाल जाधव म्हणाले “बाळासाहेब शिंदे हे माझे खूप जुने समाजकारणातील सहकारी मित्र आहेत गेल्या पंचवीस वर्षांमध्ये काँग्रेसमध्ये विविध पदावर काम करत असताना त्यांनी समाजकार्याद्वारे आपल्या कामाचा ठसा उमटवला आहे. येत्या काळामध्ये ओबीसी एससी एसटी साठी जोमाने काम करतील अशी भावना व्यक्त करत आहे.”

 पद स्वीकारताना बाळासाहेब शिंदे म्हणाले, "शिव, फुले, शाहू,आंबेडकर विचाराचे पाईक असणारे आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब तसेच प्रदेशाध्यक्ष राज साहेब राजापूरकर यांच्या विचाराला अधीन राहून येत्या काळामध्ये सक्रिय राजकारणामध्ये व समाजकारणामध्ये सहभाग घेणार आहे येत्या काळामध्ये नक्कीच पिंपरी चिंचवड शहरांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या झेंडा घरोघरी पोहोचवण्याचं काम मी प्रामाणिक करणार आहे. तसेच शहराध्यक्ष भाई विशाल जाधव यांच्या नेतृत्वाखाली चिंचवड भोसरी व पिंपरी विधानसभेमध्ये सक्रिय पक्ष बांधण्यासाठी काम करणार आहे."

पक्षाचे शहराध्यक्ष इमरान भाई शेख म्हणाले "खऱ्या अर्थाने आज मूळ विचारधारा असणारे बाळासाहेब शिंदे यांनी पवार साहेबांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश करून मोठी जबाबदारी स्वीकारली आहे. त्यांच्या मागे पिंपरी भागातील भाजी मंडई येतील व्यापारी वर्ग, तसेच बहुजनसमाज बांधवांचा मोठा जनसंपर्क आहे गेल्या दोन पंचवार्षिक मध्ये त्यांनी त्यांच्या पत्नी हिरा उर्फ पल्लवी बाळासाहेब शिंदे यांनी पिंपरी चिंचवड महानगरपालिका निवडणूक लढवलेली आहे. ओबीसी सेलच्या माध्यमातून पिंपरी चिंचवड शहरांमध्ये अतिशय चांगल्या प्रकारचे काम शहराध्यक्ष भाई विशाल जाधव करत आहेत त्यांना आमचा संपूर्ण पाठिंबा असेल."

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!