सौंदना येथे महर्षी वाल्मिक ऋषी जयंती मोठय़ा उत्साहात साजरी

केज :- दत्तात्रय मुजमुले
केज तालुक्यांतील सौंदना येथे महर्षी वाल्मिक ऋषी जयंती मोठय़ा उत्साहात साजरी करण्यात आली.शालेय विद्यार्थ्यांनी हलगीच्या ठेक्यात लेझीम खेळली, महर्षी वाल्मिक ऋषी यांच्या प्रतिमेचे पूजन करुन महाप्रसादाचा लाभ सर्व गावकर्यांनी घेतला.
त्यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सौंदना, सरपंच सौ. दिपाली दिपक भिसे तर कार्यक्रमाचे उद्घाटक कोळी राष्ट्रसंघ चे संस्थापक अध्यक्ष गोकुळ दादा कोळी, सौंदना उप सरपंच शिवराज काळदाते, सोसायटी चेअरमन अविनाश भिसे प्रमुख पाहुणे म्हणून पांडुरंग धोंडगे, कोळी राष्ट्रसंघ महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष बळीराजे वाघमारे, दत्ता कांबळे, धनराज सावंत, शिवाजी वाघमारे, अशोक दसवंते, पत्रकार अशोक कोळी हे होते.
त्यावेळी बळीराजे वाघमारे यांनी आपले मनोगत व्यक्त केले आदिवासी कोळी जमातींना संघटित होणे ही काळाची गरज आहे, प्रशासनाने आपल्याला जाणुन बुजून त्रास देण्याचे धोरण आखले आहे गेली कित्येक वर्षे झाली आजुन आपल्याकडे जात प्रमाणपत्र नाही आदिवासी कोळी जमात शिक्षणाच्या प्रवाहात नाही कित्येक योजनेपासुन वंचित आहे आपल्याला न्याय मिळवून घेण्यासाठी गट तट बाजूला ठेवून आपसातले वैर संपवून आपण सर्वांनी एकत्र येणे गरजेचे आहे आपल्यासाठी जळगांव येथे अन्नत्याग आमरण उपोषणास बसलेले आपले बांधव त्यांना आज वीस दिवस पुर्ण झाले तरीही शासन दरबारी दखल घेतली जात नाही याचे कारण म्हणजे आपण एकजुट नाही आहोत असे खणखणीत शब्दात मनोगत व्यक्त केले.
त्यावेळी कोळी राष्ट्रसंघ चे मराठवाडा अध्यक्ष भास्कर कोळी, पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष हानमंत जमादार, पश्चिम महाराष्ट्र कार्याध्यक्ष आमोल हजारे पुणे जिल्हाध्यक्ष नाना सोनवणे पुणे संजय कर्णाळकर, मंगेश यशवंते, शिवाजी इंगळवाड,ज्ञानेश्वर वाघमारे, आप्पासाहेब वाघमारे जयंतीचे मार्गदर्शक अनुसूचित जाती जमाती बीड जिल्हा अध्यक्ष मा. जनक तपसे, आमोल कोळी, सुर्यकांत तपसे, जयंती उत्सव समिती अध्यक्ष शरद वाघमारे उपाध्यक्ष ऋषीकेश तपसे, सचिव ऋषी पांढरे, कार्याध्यक्ष संदिप वाघमारे, कोषाध्यक्ष अच्युतराव वाघमारे, सहसचिव अश्रुबा वाघमारे, संजय तपसे, संदीप वाघमारे, अभिषेक वाघमारे, सचिन तपसे, ऋषीकेश वाघमारे, तुकाराम वाघमारे, गणेश वाघमारे, विशाल वाघमारे, दगडु वाघमारे, औदुंबर पांढरे, पांडुरंग पांढरे तसेच आपेगांव, इस्थळ, धानोरा खु., सोमनाथ बोरगाव, भालगाव, नायगाव, धनेगांव, सौंदना या गावातील गावकर्यांसह सर्व जमात बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.