मुळशीत भूमाफिया टोळक्याकडून वार्तांकन करण्यासाठी गेलेल्या पत्रकारावर जीवघेणा हल्ला..

चारचाकी वाहनाची तोडफोड..
भूमाफियांचा ‘मुळशी पॅटर्न’ पत्रकारांच्या जीवावर..
मुळशी : प्रतिनिधी : दि. 9 डिसेंबर : मुळशी तालुक्यातील खेचरे गावात एका खाजगी जागेत बिल्डरकडून अवैध उत्खनन करण्यात येत असल्याबाबत च्या बातमीचे वार्तांकन करण्यासाठी गेलेले स्वराज्य रक्षक न्यूज चे संपादक पत्रकार सोमनाथ नाडे यांच्यावर अनोळखी टोळक्याने जीवघेणा हल्ला केला असून त्यांना जीवे मारण्याची धमकी देत, त्यांच्या चारचाकी वाहनाची तोडफोड करण्यात आली आहे. याबाबत पत्रकार सोमनाथ नाडे यांनी पौड पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. पोलिसांत दाखल केलेल्या तक्रारीमध्ये भु-माफिया बिल्डर जयंत कनेरिया व नरेंद्र जैन यांचा हस्तक व कुख्यात गुंड गजानन मारणे टोळीचा सराईत गुंड संतोष तोंडे टोळीने जीवघेणा हल्ला केल्याचे म्हंटले आहे.
याबाबत दाखल केलेल्या फिर्यादीत पत्रकार सोमनाथ नाडे यांनी म्हंटले आहे की,
दि. ०८/१२/२०२३ रोजी सकाळी ०८:०० वा. मी माझे घरून माझे चार चाकी गाडी घेवून खेचरे, बेलवडे येथे किंग्जबे मॉउन्ट वर्ट या जमिन खरेदी विक्री प्रकल्पाची लाईव्ह कव्हरेज करणेसाठी गेलो होतो. त्यावेळी मी माझे मोबाईलवरून राहूल बबन नलावडे, रा. माले, ता. मुळशी, जि. पुणे यांना फोन करून पौड येथे तुम्ही या आपणास खेचरे बेलावडे येथील किंग्जबे मॉउन्ट वर्ट जायचे आहे असे सांगीतल होते. त्यांनतर १०:०० वा. चे सुमारास मी पौड, ता. मुळशी, जि. पुणे येथे राहुल नलावडे
हे मला भेटले. त्यांनतर राहुल नलावडे हे त्याचे मोटार सायकल वरती व मी माझे चारचाकी गाडीवर खेचरे, येथील किंग्जबे मॉउन्ट वर्ट याचे प्लॉटीगचे गेटवरती पोहचलो. त्यावेळी मी माझे माईक व लाईव्ह टेलीकास्टचे सर्व साहीत्य घेवून गाडीतुन उतरलो. त्यानंतर सदर गेटवरील बाऊसर (नाव पत्ता माहीत नाही) यास मी विंनती केली की, मला गेट मधुन आत जावु दया, मी दोन दिवसापुर्वी येथील ग्रामस्थाच्या मुलाखती घेतलेल्या आहेत, मला लाईव्ह कव्हरेज करणेसाठी वरती जावु दया, त्यावेळी बाउन्सर मला म्हणाला की, साहेबाची परवानगी घ्यावी लागेल. त्यावेळी मी त्यास म्हणालो की, तुमचे साहेब कोण आहेत? तेव्हा त्यांनी सांगीतले की, आमचे साहेब जयंत कनेरिया व नरेंद्र जैन हे आहेत, मी त्यांना फोन करून तुमचे बद्दल विचारतो असे म्हणून बाऊन्सर यानी त्याचे मोबईल वरून नरेन्द्र जैन यांना फोन लावला तो फोन स्पिकरवर असून त्यावेळी मी त्याचे समोरच उभा होतो. त्यावेळी नरेद्र जैन हे त्या बाउन्सरला फोनवरून सांगत होते की, तु त्याला वरती जावू देवू नको असे म्हणाले. त्यावेळी समोरून चार अनोळखी इसम (नाव, पत्ता माहीत नाही) हे मला शिव्या देत माझेकडे आले. तेव्हा त्या चार अनोळखी इसमास म्हणालो की, तुम्ही येथे कामाला आहेत का मला माहीत नाही, मला माझे काम करू दया, असे म्हणालो तेव्हा ते सर्वजण मला शिव्या देतच होते. तेव्हा परत मी त्यांना म्हणालो की, तुम्ही मला शिव्या देवू नका, मला माझे काम करू दया असे म्हणालो असता त्यातील एकजणाने माझे हातातील बुम (माईक) हिसकावून घेतला तो त्यांनी खाली आपटून तोडून टाकला आणि मला म्हणाला की, तु येथून निघून जा, नाहीतर तुला जिवे मारेन, त्यावेळी त्यांना म्हणालो की, मी पत्रकार आहे आणि लाईव्ह शुटींग चालू आहे, विजय तोंड व इतर खेचरे ग्रामस्थ यांचे मागणीवरून येथे शुटींगसाठी आलो आहे असे म्हणाले असता त्या सर्वानी मला हाताने मारहाण करणेस सुरूवात केली. त्यावेळी त्या सर्वानी माझे पोटात, डोक्यावर, तोंडावर, पाठीवर लाथाबुक्याने मारहाण केली. त्यांनतर त्यातील एकाने माझी गच्छी पकडून तोंडावर मारहाण केली. त्यावेळी त्यातील एकजण म्हणाला की, आण रे सामान, आपण याला खल्लास करू असे म्हणून त्यांनी माझा मोबाईल हिसकवून घेवून बाजूला फेकून दिला. त्योवळी मी माझा मोबाईल घेणेसाठी गेलो तेव्हा त्यानी लाकडी काठी, कोयते आणि लोखंडी सळया घेवून माझी चार चाकी गाडी फोडून टाकली. त्यांनतर मी शेतातुन पळून रस्त्यावर आलो. त्यावेळी ते सर्वजण पळत माझेकडे रस्त्यावर आले व मला म्हणाले की, ‘नरेद्र जैन, जयंत कनेरिया आणि संतोष तोंडे हे कोण आहेत तुला माहीत आहेत का? तु त्याचेशी पंगा नको घेवू, तुला हजार वेळा सांगीतले होते तु त्याचे नादाला लागु नको’ असे म्हणून मला परत हाताने लाथाबुक्याने मारहाण करून माझा शर्ट फाडला. त्यांनतर तेथून मी पळत आलो असता परत माझे पाठीमागे कोयते घेवून येवुन त्या सर्वानी मला परत मारहाण केली. सदरचा वरील सर्व प्रकार राहूल नलावडे यांचे समोरच झालेला आहे. त्यांनतर राहूल नलावडे हे त्याचे मोटार सायकलवरती मला घेवून पौड पोलीस स्टेशन येथे तक्रार देणेसाठी मी आलो आहे. त्यावेळी तेथील पोलीसानी मला उपचारकरीता वैदयकीय यादी दिली. त्यानंतर मी ग्रामीण रूग्णालय पौड येथे उपचार घेवून तकार देणेसाठी आलो आहे. सदर घडलेल्या प्रकाराचा विडीओ शुटीग माझे मोबाईलवर झालेली आहे. तो मी आपणास हजर करेन. असे तक्रारींमध्ये नमूद केले आहे..
सदर घटनेबाबत विविध क्षेत्रांतून नाराजी व निषेध व्यक्त केला जात आहे, पिंपरी चिंचवड पत्रकार संघाच्या वतीने पत्रकारांवर होणाऱ्या अशा भ्याड जीवघेण्या हल्ल्याची पोलीस प्रशासनाने गंभीर दखल घ्यावी व गुन्हेगारांवर तात्काळ पत्रकार हल्ला विरोधी कायद्याच्या अंतर्गत कारवाई करावी अशी मागणी पिंपरी चिंचवड पत्रकार संघाचे अध्यक्ष अनिल वडघुले यांनी केली आहे.