Uncategorized

युसूफवडगांव पोलिसांनी दिला लाडक्या बप्पाला निरोप

केज :- दत्तात्रय मुजमुले

तालुक्यातील युसूफवडगांव येथील पोलीस स्टेशन मधील कर्मचाऱ्यांनी विसर्जन बंदोबस्तातुन वेळ काढून गणपतीचे आज सकाळी वाजतगाजत विसर्जन करण्यात आले यावेळी सर्व कर्मचाऱ्यांनी गाण्यावर ठेका धरत विसर्जन मिरवणुकीत नाचण्याचा मनमुराद आनंद घेतला.
गेल्या दहा दिवसापासुन भक्तांचा लाडका बप्पा विराजमान झालेला होता.आपल्या लाडक्या गणपतीला आता सर्वजण निरोप देण्याच्या तयारीत आहेत.त्यामुळे युसूफवडगांव येथील पोलीस स्टेशन मधील गणपती बप्पाला पण आज एक दिवस अगोदर वाजतगाजत निरोप देण्यात आला.

यावेळी सपोनि योगेश उबाळे साहेब यांच्या मार्गदर्शना खाली आज सकाळी विसर्जन मिरवणुक आयोजित करण्यात आली होती.वाजतगाजत पोलीस गाडीवर बसवून गणपतीची विसर्जन मिरवणुक काढण्यात आली.यावेळी पोलीस कर्मचाऱ्यांनी विविध हिंदी मराठी गाण्यावर ठेका धरत गणपती बप्पाच्या विसर्जन मिरवणुकीत मनमुराद नाचण्याचा आनंद घेतला.

यावेळी गावकऱ्यांनी सुद्धा या विसर्जन मिरवणुकीत पोलिसांसोबत नाचण्याचा आनंद घेतला सोबतच सपोनि योगेश उबाळे साहेब यांनी सुद्धा आपल्या कर्मचाऱ्यांसोबत गाण्यावर ठेका धरला होता.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!