राजकीय

लोकसभेच्या पार्श्वभूमीवर बहुजन विकास परिषदेच्या बैठकीचे आयोजन !

केज : प्रतिनिधी

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बहुजन विकास परिषदेच्या बीड जिल्ह्यातील कार्यकर्त्याची बैठक केज-कळंब रोड मोंढा कमानी समोर बहुजन विकास परिषद विभागीय कार्यालय येथे दि.७ एप्रिल २०२४ रोजी सकाळी ११ वाजता आयोजित करण्यात आली आहे.अशी माहिती बहुजन विकास परिषदचे संस्थापक अध्यक्ष रमेश तात्या गालफाडे यांनी दिली आहे.या बैठकीत महाराष्ट्रातील लोकसभा निवडणुकीच्या संदर्भात संघटनेची भूमिका देखील जाहीर करण्यात येणार आहे.बीड जिल्ह्यातील पदाधिकारी या बैठकीला उपस्थित राहणार आहेत.आपल्या जिल्ह्यामध्ये होणाऱ्या लोकसभा निवडणुकिच्या पार्श्वभुमीवर तसेच ज्या खासदारांनी बहुजन समाजाला न्याय देण्याचे प्रामुख्याने काम केले.त्यांच्या पाठीमागे बहुजन विकास परिषद प्रामाणिकपणे येत्या लोकसभेच्या व यापुढील सर्व निवडणुकांमध्ये त्यांना साथ देण्याचे काम करणार आसल्याची माहिती बहुजन विकास परीषदेचे संस्थापक अध्यक्ष रमेश तात्या गालफाडे यांनी दिली.

या बैठकीसाठी बहुजन विकास परिषदेचे महाराष्ट्र कार्याध्यक्ष बाळासाहेब सिरसाट,महाराष्ट्र उपाध्यक्ष सूर्यकांत भालेराव,सेवानिवृत्त गटविकास अधिकारी मिलिंद गालफाडे,मराठवाडा अध्यक्ष डॉ. चंद्रशेखर गवळी,बीड जिल्हाध्यक्ष गोरख मोमीन,मराठवाडा संघटक भास्कर धुरंधरे, मराठवाडा उपाध्यक्ष रामेश्वर चांदणे,युवक जिल्हाध्यक्ष अंकुश रोकडे,बीड जिल्हा संपर्क प्रमुख मसू पवार,जिल्हा कार्याध्यक्ष सुधाकर कानाडे,प्रसिद्धी प्रमुख सनी शेख,बीड महिला जिल्हाध्यक्ष प्रियंका धुताडमड,तसेच बीड जिल्ह्यातील सर्व तालुका अध्यक्ष, युवक तालुका अध्यक्ष, तालुका उपाध्यक्ष व सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित राहणार आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!