Uncategorized

पाटबंधारे विभागातील एच.बी.बोरगे सेवानिवृत्त

केज:- दत्तात्रय मुजमुले

धनेगाव येथील पाटबंधारे सिंचन शाखा क्र.1 येथे कार्यरत असणारे कालवा चौकीदार एच.बी.बोरगे हे नियत वयोमानाप्रमाणे 30 सप्टेंबर रोजी सेवानिवृत्त झाले.
एच.बी.बोरगे हे अत्यंत मनमिळाऊ स्वभावाचे,अधिकारी ,कर्मचारी व परिसरातील शेतकऱ्यांसोबत मिळून मिसळून राहणारे असल्याचे ते सर्व परिचित होते.वयाची 39 वर्ष त्यांनी पाटबंधारे विभागात नौकरी केली.त्यापैकी धनेगाव येथील पाटबंधारे सिंचन शाखा क्र.1 येथे मांजरा धरण क्षेत्रात आपली 12 वर्ष कालवा चौकीदार म्हणून सेवा करत नियत वयोमानाप्रमाणे सेवानिवृत्त झाले त्याबद्दल धनेगाव येथील शाखेत त्यांचा सेवानिवृत्तीचा कार्यक्रम घेण्यात आला.


याप्रसंगी शाखा अभियंता श्री.सुरज निकम,श्री.ठोंबरे,श्री.पवार,श्री. गदळे,श्री.वाघमारे,श्री.पोटभरे,सेवानिवृत्त कर्मचारी श्री.गुजर उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!