राजकीय
केज विधानसभा मतदार संघातील मोठी बातमी

केज :- विधानसभा मतदार संघाच्या माजी आमदार संगीता ठोंबरे यांनी जोरदार रॅली काढत निवडणूक अर्ज दाखल केला होता. या विधानसभा निवडणुकीत त्या रंगत आणणार असं वाटतं असताना त्यांनी अर्ज वापस घेण्याच्या दिवशी आपला अपक्ष उमेदवारी अर्ज वापस घेतला आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे उमेदवार पृथ्वीराज साठे हे यावेळी त्यांच्या सोबत दिसून आले.माजी आमदार प्रा. संगीताताई ठोंबरे यांचा राष्ट्रवादी काँगेस शरदचंद्र पवार गटाचे उमेदवार पृथ्वीराज साठे यांना जाहीर पाठींबा असल्याची माहिती समोर येत आहे.