महायुती उमेदवाराच्या प्रचारार्थ जाहीर सभेचे आयोजन

केज :- प्रतिनिधी
विधानसभेसाठी आमदार नमिता अक्षय मुंदडा यांना पुन्हा पक्षाने उमेदवारी देत विश्वास कायम ठेवला. गेल्या पंचवार्षिक मध्ये केज विधानसभा मतदारसंघात रस्ते, पाणी, आरोग्य केंद्र उपकेंद्र, वीज उपकेंद्र सह ज्येष्ठ नागरिक, लाडकी बहीण योजना यशस्वी रित्याअनेक योजना मतदार संघात राबवल्या. विकास कामांच्या जोरावर त्या पुन्हा मतदारसंघांमध्ये मतदारांचा आशीर्वाद घेण्यासाठी संवाद साधत आहेत. विरोधी उमेदवारां पेक्षा त्यांनी प्रचारामध्ये मुसंडी मारलेली दिसते आहे. मतदारसंघांमध्ये त्यांना प्रचंड प्रमाणात प्रतिसाद भेटत आहे. तेव्हा निवडणुकीच्या प्रचाराच्या अनुषंगाने केंद्रीय रस्ते विकास मंत्री तथा ज्येष्ठ नेते नितीनजी गडकरी हे या विकास कन्येच्या प्रचारासाठी आज दिनांक 12 नोव्हेंबर रोजी सुसंस्कृत शहर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या अंबाजोगाई मध्ये त्यांच्या प्रचार सभेचे आयोजन करण्यात आले आहे .
या सभेसाठी आ. पंकजाताई मुंडे, मा. खा. प्रीतम मुंडे सह पक्षाचे ज्येष्ठ नेते, या सभेसाठी उपस्थित राहणार आहेत. तरी या सभेस उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.