Uncategorized

हजरत टिपू सुलतान यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी

अंबाजोगाई तालुक्यातील घाटनांदुर येथे हजरत टिपू सुलतान यांच्या जयंतीनिमित्ताने रक्तदान शिबिर व टिपू सुलतान चौक फलकाचे अनावरण ही करण्यात आले. घाटनांदुर मध्ये सर्व समाजांनी मिळून एकत्ररीत्या जयंती साजरी केली.जयंती मध्ये देखावे ही होते.यानिमित्ताने हजरत टिपू सुलतान यांच्या फलकाचे अनावरण करण्यात आले. कार्यक्रमासाठी घाटनांदुरचे सरपंच महेश आप्पा गारटे तसेच माजी सरपंच माऊली बाप्पा जाधव, माजी जिल्हा परिषद सदस्य दत्ता काका जाधव, गणेश देशमुख ,महबूब शेख ,मुर्तुजा शेख, इरफान , रामभाऊ वैद्य, अन्वर शेख, अखिल शेख, उमर शेख, सुभाष चव्हाण, दादा वैद्य , ग्रामपंचायत सदस्य सलाम, ग्रामपंचायत सदस्य सहबाज शेख, जलील शेख, सादिक शेख असे गावातील प्रतिष्ठित नागरिक उपस्थित होते. हजरत टिपू सुलतान यांनी भारत देशासाठी स्वातंत्र्य होण्यासाठी आपला लढा उभा केला होता. पूर्ण भारतभर आज त्यांची जयंती साजरी केली जात आहे.तसेच ते युवकांसाठी प्रेरणा स्त्रोत ही आहेत. यानिमित्ताने घाटनांदुर मध्ये रक्तदान शिबिर घेण्यात आले या शिबिरास 50 असून अधिक रक्तदाते होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!