विशेष

आळंदी कंपनीतील चोरीच्या तयारित आंतरराष्ट्रीय टोळीला आळंदी पोलीसांनी केले अटक.

आळंदी – कंपनीत दरोड्याच्या तयारीत असलेल्या आंतरराष्ट्रीय टोळीला आळंदी पोलिसांनी सापळा लावून अटक केली. त्यांच्याकडून 6 लाख 27 हजार 875 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. याप्रकरणी सहा जणांविरुद्ध आळंदी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर या टोळीमध्ये दोन अल्पवयीन मुलांचाही समावेश आहे.नयसिंग ऊर्फ नेनेशी लालसिंग ढोली (वय 48 ), निट बहमसिंग ढमाई ऊर्फ नृप भुवानसी दमाई (वय 32), विशाल शेटे ऊर्फ शेरे ढोली (वय 18), दिनेश नयसिंग ऊर्फ नेनेशी ढोली (वय 19), नैनसी खडकसी ढोली, लक्ष्मण राजु दमाई (वय 21, सध्या सर्व रा. लोणी काळभोर, ता. हवेली, मुळ गाव लम्की, ता. चुहा, नेपाळ), आणि एका विधीसंघर्षीत बालक यांना पोलिसांनी अटक केली.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सर्व आरोपी चिंबळी- केळगाव रस्त्यावरील रेड्डी कस्टम प्रा. लि. या कंपनीमध्ये दरोडा टाकण्यासाठी येणार असल्याची माहिती मिळाली होती. त्यानुसार सापळा लावण्यात आला. 6 ते 7 जण तोंडाला रुमाल बांधून आले होते. पोलिसांनी घेराव घालून त्यांना पकडण्याचा प्रयत्न केला असता अंधाराचा फायदा घेऊन दरोडेखोर पळून जात होते. पोलिसांनी पाठलाग करून त्यातील पाच जणांना पकडले, तर नैनसी खडकसी ढोली हा पळून जाण्यात यशस्वी झाला. त्याला शुक्रवारी (दि. 19) निगडी येथून ताब्यात घेण्यात आले.ही कारवाई पोलीस आयुक्त अंकुश शिंदे, अपर आयुक्त डॉ. संजय शिंदे, उपायुक्त परिमंडळ 1 मंचक इप्पर, सहायक आयुक्त प्रेरणा कट्टे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ निरीक्षक सुनील गोडसे, निरीक्षक (गुन्हे) रमेश पाटील, तपास पथकाचे उपनिरीक्षक बी. एम. जोंधळे, राजाराम लोणकर,बाजीराव सानप, नितीन साळुंखे बाळासाहेब खेडकर, कैलास गर्जे, गजानन आडे, विकास पालवे, सचिन बांगर यांनी केली. पुढील तपास आळंदीचे उपनिरीक्षक विद्या कदम करीत आहेत.
पाच गुन्हे उघडकीस आणण्यात यश आरोपी हे सराईत असून त्यांच्यावर या आधी आळंदी पोलीस ठाण्यातील चार आणि चाकण पोलीस ठाण्यातील एक असे पाच गुन्हे उघडकीस आणण्यात यश आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!