प्रजासत्ताक दिनानिमित्ताने विजयनगर येथे मास्क, गणवेश वाटप व ॲम्बुलन्स लोकार्पण सोहळा
प्रतिनिधी:महावीर जाधव
काळेवाडी:- चिंचवड विधानसभेचे कार्यसम्राट आमदार लक्ष्मण भाऊ जगताप यांच्या मार्गदर्शनानुसार व एन टी. सेल भाजपा अध्यक्ष सांगवी मंडल मा. श्री प्रकाश लोहार यांच्या माध्यमातून 73 व्या प्रजासत्ताक दिनानिमित्ताने काळेवाडी विजयनगर येथे नागरिकांना कोरोना विषाणू पासून बचावासाठी मास्क चे वाटप करण्यात आले. तसेच विजयनगर भागातील धर्मवीर संभाजीराजे रिक्षा स्टॅन्ड या ठिकाणी संपूर्ण रिक्षा चालक व मालक यांना मोफत गणवेश वाटप करण्यात आला ,यावेळी नागरिकांमध्ये व रिक्षा चालक व मालक यांच्या मध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले होते,तसेच त्यांच्याकडून प्रकाश लोहार यांचे आभार मानून त्यांना त्यांच्या पुढील राजकीय वाटचालीस शुभेच्छा दिल्या. सायंकाळी सहा वाजता काळेवाडी विजयनगर येथील प्रकाश लोहार यांच्या जनसंपर्क कार्यालय या ठिकाणी अंबुलन्स लोकार्पण सोहळा उद्योजक माजी नगरसेवक श्री शंकर शेठ जगताप व सत्तारूढ पक्ष नेते नामदेव ढाके यांच्या शुभहस्ते करण्यात आले. यानंतर प्रकाश लोहार यांच्या कडून आलेल्या सर्व प्रमुख मान्यवर यांचे शाल ,श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सन्मान करण्यात आला. यावेळी प्रकाश लोहार यांच्या सामाजिक व राजकीय कार्याबद्दल अनेक मान्यवरांनी त्यांचे गुणगौरव व्यक्त केले, यावेळी माजी नगरसेवक शंकरशेट जगताप म्हणाले की प्रकाश लोहार यांचे सामाजिक कार्य चांगल्या प्रकारे आहे,अनेक वर्षा पासून ते सामाजिक व राजकीय कार्य करत आहेत, त्यांनी आपल्या कार्यामधून व आमदार लक्ष्मण भाऊ जगताप यांच्या संकल्पनेनुसार, समाजसेवा हीच ईश्वर सेवा याप्रमाणे आज अंबुलन्स लोकार्पण करून एक रुग्णसेवा केली आहे ,तसेच प्रजासत्ताक दिनानिमित्ताने आपल्या परिसरात त्यांनी मास्क व गणवेश वाटप करून आगळीवेगळी समाजसेवा केली आहे, त्यांनी आपल्या माध्यमातून अशीच समाजोपयोगी कार्य पुढील काळात करावी अशी अपेक्षा व्यक्त केली व त्यांना त्यांच्या सामाजिक व राजकीय पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या ,या कार्यक्रमाला पुढील मान्यवर उपस्थित होते ,उद्योग माजी नगरसेवक शंकरशेठ जगताप ,सत्तारूढ पक्ष नेते नामदेव ढाके, नगरसेवक मोरेश्वर शेंडगे ,जिल्हा उपाध्यक्ष धर्मा पवार ,स्वीकृत सदस्य विनोद तापकीर ,भाजपचे ज्येष्ठ नेते दिलीप भाऊ आंब्रे, सामाजिक कार्यकर्ते रमेश काळे, ज्येष्ठ नागरिक संघ अध्यक्ष पद्माकर जांभळे ,रुपेश पवार ,अरविंद लोहार, रुपेश तापकीर ,शिवाजी पाटील रिक्षा युनियन अध्यक्ष, साजन पाटील ,कामगार आघाडी मंडळाचे अध्यक्ष हनुमंत सुतार, शांताराम पाटील, सुखदेव खेडकर ,हिरामण मनोरे, बाळू पाटील, जितेंद्र पवार युवा मंडळ सरचिटणीस ,किरण पाटील ,राजू पाटील ,मनोज धनगर ,विक्रम आहिरे, सागर ,चंदू पाटील, संभाजी पवार ,सौ .नंदा खापुरे, सौ. भारती लोहार ,उज्वला थॉमस ,सुनीता खराडे ,याचिका लोहार व अन्य आजी-माजी कार्यकर्ते व परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.