Uncategorized

केज-कळंब रोडवर सुर्डी फाट्यावर रास्ता रोको आंदोलन

केज :- दत्तात्रय मुजमुले मराठा आरक्षण तात्काळ मिळावे आणि जरांगे यांच्या उपोषणाला पाठींबा देण्यासाठी केज-कळंब रोडवर सुर्डी फाटा येथे गावकऱ्यांनी रस्ता रोको आंदोलन केले. त्यामुळे रस्त्यावरील वाहतूक खोळंबली आहे.सप्टेंबर रोजी सकाळी १०:३० वा. केज-कळंब रोडवर सुर्डी फाट्यावर सकल मराठा बांधवांच्या वतीने मराठा आरक्षणासाठी रस्ता रोको आंदोलन करण्यात आले.

यावेळी आंदोलकांनी मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मागील पंधरा दिवसा पासून जालना जिल्ह्यातील आंतरवली सराटे येथे उपोषणाला बसलेले मनोज जरांगे पाटील यांना पाठींबा दिला. तसेच आंदोलकांवर अमानुष लाठीहल्ला करणाऱ्या सरकारचा आणि गृह खाते व गृहमंत्री तथा उपमुख्यमंत्री ना. देवेंद्र फडणवीस यांचा निषेध व्यक्त करण्यात आला.या रस्ता रोकोच्या आंदोलनात जनविकासचे रमेश भिसे, अभिषेक भिसे, शिवसंग्रामच्या महिला आघाडीच्या ॲड. मनिषाताई कुपकर,पंकज भिसे, संभाजी ब्रिगेडचे अतुल गायकवाड, राहुल खोडसे,प्रवीण खोडसे,शाहूराव ठोंबरे या प्रमुखासह सुर्डी, सोनेसांगवी, माळेगाव या गावातील सकल मराठा बांधव आणि महिला मोठ्या प्रमाणात सहभागी झाले होते. हे रस्ता रोको आंदोलन सुमारे एक तासापेक्षा जास्त वेळ सुरू असल्याने स्त्यावरील वाहतूक ठप्प होऊन रस्त्याच्या दोन्ही बाजूला वाहनाच्या मोठ्या रांगा लागून वाहतूक खोळंबली होती.

रस्त्यावर टायर पेटविले :- आंदोलकांनी रस्त्यावर टायर पेटवून रस्ता रोको आंदोलन केले.

लहान मुलासह महिलाही उतरल्या रस्स्यावर :- या आंदोनलात लहान मुलांना कडेवर घेऊन महिला देखील सहभागी झाल्या होत्या. एक आजारी माता व तिच्या नवजात बाळाला दवाखान्यात जाण्यासाठी आंदोलकांनी रस्ता रिकामा करून दिला.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!