Uncategorized

मराठा आरक्षणासाठी दोन दिवसांचे लाक्षणिक उपोषण.

केज :- दत्तात्रय मुजमुले

केज तालुक्यातील काळेगाव घाट येथे मराठा आरक्षणास पाठिंबा देण्यासाठी दोन दिवसाचे लाक्षणिक उपोषण हनुमान मंदिरा समोर करण्यात येत आहे, सध्या मराठा आरक्षण प्रश्न ऐरणीवर आला असून जालना जिल्ह्यात अंतरवाली सराटी या गावात सामाजिक कार्यकर्ते मनोज जरांगे पाटील यांचे आमरण उपोषण चालू आहे या उपोषनाचा आज 14 दिवस आहे, या उपोषणास पाठिंबा देण्यासाठी काळेगाव घाट येथे दि. 12 सप्टेंबर व13 सप्टेंबर या दोन दिवसाचे लक्षणीय उपोषण केले जात आहे.

या उपोषनात ईश्वर आगे, पंकज सुकाळे, अजय कोठावळे, गणेश चाळक सहभाग नोंदवत आहेत. या संदर्भातले निवेदन केज तहसील कार्यालयास दिले आहे. आज पर्यंत मराठा आरक्षणाचा वापर अनेकांनी राजकीय हत्यार म्हणून केला. सरकारे बदलली, आंदोलनेझाले, उपोषणे झाले, महामोर्चे झाले अनेकांनी बलिदान दिले पण मराठा समाजाला अजूनही आरक्षण मिळू शकलं नाही. सुप्रीम कोर्टाने मराठा आरक्षण फेटाळल्यानंतर अजूनही हा तिढा सुटला नाही. पण मराठा समाजात आरक्षणासंदर्भात धग अजूनही कायम आहे.

मराठा आरक्षणा संदर्भात अंतरवली सराटी येथे सुरू असलेल्या मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणास पाठींबा म्हणून आता गावा गावातून मोर्चे आंदोलने सुरू झाले आहेत. याच अनुषंगाने केज तालुक्यातील काळेगाव घाट येथे ग्रामस्थांच्या उपस्थित आंदोलन होत आहे

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!