Uncategorized

युसुफ वडगाव सर्कल मधील शेतकऱ्यांना अग्रीम विमा व अतिवृष्टीचे अनुदान वाटप करण्याची शेकापची मागणी

केज ( प्रतिनिधी) :-

केज तालुक्यातील युसुफवडगाव सर्कल मधील शेतकऱ्यांचा एग्रीम पीक विमा तात्काळ वाटप करावा,अतिवृष्टीमुळे नुकसानीचे बाकी असलेले 50 टक्के अनुदान वाटप करा,युसुफवडगाव सर्कल मध्ये दुष्काळ सदृश्य परिस्थिती असल्यामुळे जनावरांच्या चारा छावण्या सुरु करा,सन 2020 चा खरीप विमा शेतकऱ्यांना तात्काळ द्या,शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमाफी करा, युसुफवडगाव सज्जावर नियमित तलाठी सजावर हाजर राहवे, शेती मालाला हामी भाव द्यावा, वरील मागण्याची दखल घ्यावी अन्यथा शेतकरी कामगार पक्षाच्या वतीने भाई मोहन गुंड यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन करण्यात येईल असा इशारा भाई राचलिंग पाटील, भाई अशोक रोडे,भाई गुरुप्रसाद थळकरी, भाई मंगेश देशमुख यांनी दिला आहे.नायब तहसीलदार, तालुका कृषी अधिकारी, विमा प्रतिनिधी अधिकारी, मा कृषी मंत्री महाराष्ट्र राज्य मुंबई यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!