शैक्षणिक

केज तालुका पदाधिकाऱ्यांचे गटशिक्षणाधिकाऱ्यांना निवेदन.

केज/ प्रतिनिधी.

गेल्या १९ वर्षापासून विना अनुदानित व अंशतः अनुदानित शाळा मधिल विनावेतन काम करणाऱ्या शिक्षकांनी आज पर्यंत अनुदानसह इतर न्याय मागण्यांसाठी अनेक आंदोलने केली, ३ जानेवारी २४ पासून मुंबई येथे आझाद मैदानावर अंशतः अनुदानित शिक्षकांचे पुढील वाढीव टप्पा मिळण्यासाठी व इतर मागण्यासाठी बेमुदत धरणे आंदोलन चालू असून अजून पर्यंत सरकारने याची दखल घेतली नाही.

या अनुषंगाने केज तालुका शिक्षक समन्वय संघाने तहसील प्रशासन व शिक्षण विभागला निवेदन देऊन राज्यातील सर्व विभागीय मंडळामध्ये सुरू असलेल्या बारावी व १ मार्चला सुरू होणाऱ्या दहावी परीक्षा पेपर तपासणीवर सर्व अंशतः अनुदानित शिक्षकांच्या मागण्या मान्य होईपर्यंत व १ जानेवारी२०२४ पासूनचा अनुदानाचा वाढीव टप्पाचा शासन निर्णय निर्गमित करेपर्यंत बहिष्कार टाकण्याचा इशारा दिला.

यावेळी केज शिक्षक समन्वय संघाचे अशोक इतापे, केदार एम डी,टिंगरे बी. एम, अतुल जाधव, फुंदे एम. एस .सारुक एस. आर . यांच्या सह अनेकांची उपस्थिती होती.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!