राजकीय

आष्टीचे तिन्ही विग्न दूर करण्यासाठी ऋषिकेश विघ्ने रोडरोलर चिन्हावर विधानसभा निवडणुकीच्या मैदानात – महेश बांगर

बीड (प्रतिनिधी): बीड जिल्ह्यातील २३१ आष्टी पाटोदा शिरूर विधानसभा मतदारसंघातून ऋषिकेश लक्ष्मण विघ्ने यांनी अपक्ष निवडणूक रोडरोलर या चिन्हावर लढवत आहेत. युवकांना नोकऱ्या, शेतकऱ्यांना पाणी, शेतीमालाला हमीभाव, विधानसभा मतदारसंघात एमआयडीसी, आयटी हब, गाव तेथे डांबरी रस्ता इत्यादींची आवश्यकता आहे परंतु प्रस्थापित आष्टीच्या तिन्ही नेत्यांनी विकासाला डावलून फक्त घराणेशाही चालवण्याचा प्रयत्न केला जात असल्याचे जनतेच्या लक्षात आले आहे. सामान्य जनतेतील आमदार या नेत्यांना नको आहे. जिल्ह्यात युवकांना रोजगार देणे ऐवजी त्यांना राजकारणाच्या नादी लावून त्यांची दिशाभूल करून त्यांच्या हातात झेंडे देऊन फक्त कार्यकर्ते म्हणून ठेवण्याचे काम आजपर्यंत ह्या प्रस्थापितांनी केले आहे. त्यामुळे आता वेळ आली आहे ह्या प्रस्थापितांना डावलून नवीन नेतृत्वाला संधी देण्याची विधानसभा मतदारसंघाचा सर्वांगीण विकास होणे काळाची गरज असल्याचे मत आता सामान्य जनतेतून समोर येत असल्याचे मत पाटोदा चे युवा नेते महेश बांगर यांनी आमच्या प्रतिनिधीशी बोलताना व्यक्त केले आहे.


Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!