शैक्षणिक

प्राचार्य डॉ. प्रकाश पांढरमिसे यांना जिल्हास्तरीय आदर्श गुणवंत शिक्षक पुरस्काराने गौरव


भवानीनगर :दि 06 (स्टार 24 न्युज मराठी न्युज नेटवर्क)
भवानीनगर येथील श्री छत्रपती शिक्षण संस्थेचे, श्री छत्रपती कला वाणिज्य महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. प्रकाश बुवाजी पांढरमिसे यांना शिक्षक दिनाच्या निमित्ताने कार्यक्षम व कर्तव्यदक्ष मा. विकासनाना दांगट जिल्हास्तरीय आदर्श गुणवंत शिक्षक पुरस्कार अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष व लोकप्रिय साहित्यिक डॉ. श्रीपाल सबनीस, आमदार रवींद्र धंगेकर.विकासनाना दांगट, डॉ.सुधाकर जाधवर या मान्यवरांचे हस्ते सन्मानचिन्ह, प्रमाणपत्र, ट्रॉफी, शाल श्रीफळ देऊन गौरवण्यात आले.
डॉ. प्रकाश पांढरमिसे हे गेली 17 वर्षांपासून वरिष्ठ महाविद्यालयात पदवी अन् पदव्यूत्तर विभागामध्ये इतिहास विषयाच्या अध्यापनाचे कार्य करीत असून एक अभ्यासू, उत्तम व्याख्याता,प्रामाणिक, शिस्तप्रिय, वक्तशीर, मेहनती, कार्यकुशल, विध्यार्थीप्रिय हाडाचा शिक्षक, नवोपक्रमशील प्रशासक, संशोधक म्हणून ते सर्वांना सुपरिचित आहेत. डॉ. पांढरमिसे यांनी अतिशय प्रतिकूल परिस्थितीतून शिक्षण घेतले असून त्यांनी 2003 साली बारामतीच्या विद्याप्रतिष्ठान कॉलेजमधून बी ए इतिहास विषयातून पदवी तर 2005 साली पुणे विद्यापीठाच्या इतिहास विभागातून पदव्युत्तर एम ए.चे शिक्षण घेतले आहे. 2010 साली ते महाराष्ट्र व गोव्यातून घेतल्या गेलेल्या सेट परीक्षेत इतिहास विषयातून दुसऱ्या क्रमांकाने उत्तीर्ण झाले आहेत. आशिया खंडातील अग्रगण्य समजल्या जाणाऱ्या पी. डी. सी. सी बँकेवर “पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचा इतिहास इ.स.1917 ते 2004 ” या विषयात डॉ. शामराव घाडगे यांच्या मार्गदर्शनाखाली सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठामधून 3 जुलै 2019 रोजी पीएच. डी.प्राप्त केली आहे. याशिवाय त्यांनी 60 पेक्षा अधिक राज्यस्तरीय, राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय पातळीवरील संमेलने,चर्चासत्रे व परिषदांमधून सक्रिय सहभाग घेतला असून राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवरील इतिहास परिषदांमधून त्यांचे 31 शोधनिबंध प्रकाशित झाले आहेत.
डॉ. पांढरमिसे हे पुणे विद्यापिठाचे बहि:शाल शिक्षण मंडळाचे कायम स्वरूपी व्याख्याता म्हणून त्यांना 2014 साली मान्यता मिळाली आहे. आजवर त्यांनी विविध शाळा महाविद्यालये, व गावांमधून 1000 पेक्षा अधिक विविध विषयांवर व्याख्याने दिली आहेत. 2019 साली त्यांना ‘राज्यस्तरीय उत्कृष्ट व्याख्यता’ हा पुरस्कार मिळाला आहे. कोरोना काळात राष्ट्रीय सेवा योजना विभागाचा विभाग समन्वयक म्हणून सामाजिक बांधिलकी व आरोग्य जनजागृती साठी उत्तम कार्य केल्याबद्दल सावित्रीबाई फुले पुणे विद्यापिठाने नुकताच प्रशंसा पुरस्कार देऊन गौरव केला आहे.
डॉ. पांढरमिसे यांनी ‘प्रकाशकिरण’च्या माध्यमातून 750 पेक्षा अधिक विचारधन सोसियल मिडीयचा माध्यमातून त्यांनी वाचकांपर्यत दिली आहेत.त्यांनी अध्ययन अध्यापना बरोबरच विध्यार्थी कल्याण अधिकारी, राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी, विभागीय समन्वयक म्हणून अनेक वर्ष उत्कृष्ट काम केले आहे. त्या कार्याचा महाविद्यालयाला पुणे विद्यापिठाचा पुरस्कार देऊन गौरव केला आहे.त्यांनी विधार्थी कल्याण व राष्ट्रीय सेवा योजना विभागांच्या माध्यमातून विध्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास, सामाजिक प्रश्नांसंदर्भात जनजागृती, सांगली, कोल्हापूर पूरग्रस्त व आपत्ती ग्रस्तांना मदत फेरीच्या माध्यमातून आर्थिक मदत व जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा,सामाजिक बांधिलकी, आरोग्य जनजागृती,पर्यावरण संवर्धन, वाचन संस्कृतीचा विकास, स्थानिक इतिहास लेखन, आळंदी ते पंढरपूर स्वच्छ वारी स्वस्थ वारी, हरित वारी, निर्मल वारी, लोकशाही वारी या विध्यार्थी वारीसाठी संघनायक म्हणून उत्तम काम केले आहे.सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या राष्ट्रीय सेवा योजना विभागाने अनुक्रमे 2018 आणि 2021साली कडुलिंब वृक्ष वाटप व पालकी मार्गवर वृक्षारोपण आणि भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षांमध्ये हर घर तिरंगा या उपक्रमांच्या माध्यमातून केलेल्या दोन्हीही गिनीज वर्ल्ड उपक्रमामध्ये रासेयो विभाग समन्वयक म्हणून प्रत्यक्ष सहभाग घेऊन उत्तम कार्य केले आहे.त्याचा विशेष गौरव सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने केला आहे.अशा या सर्व उपक्रमांच्या माध्यमातून त्यांनी उल्लेखनीय कार्य केले आहे. ‘माझ्यासाठी नव्हे तर इतरांसाठी’ या तत्वाचा अंगीकार करून सामाजिक बांधिलकी व सामाजसेवेचे व्रतही केलेल्या कार्याच्या माध्यमातून जोपासले आहे. प्रत्येक प्राध्यापकाने ज्ञानाधिष्टीत अशा सुसंस्कृत व जबाबदार नागरिकांच्या जडणघडणीत स्वतःला समर्पित केले पाहिजे असे ते सांगतात.
डॉ. पांढरमिसे यांच्या शैक्षणिक जडणघडणीत बारामतीच्या विद्या प्रतिष्ठान महाविद्यालयाचा प्राध्यापक वर्ग व महाविद्यालयाचे तत्कालीन प्राचार्य व सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ.अरुण अडसूळ सर यांचे विशेष योगदान राहिले आहे.तसेच प्रा. तेज निवळीकर ,प्राचार्य डॉ. संजय चाकणे यांचेही विशेष योगदान असल्याचे ते आवर्जून सांगतात.
डॉ. पांढरमिसे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार मिळाल्या बद्दल इंदापूर तालुक्याचे कार्यसम्राट आमदार माजी मंत्री मा. दत्तात्रय मामा भरणे, श्री छत्रपती शिक्षण संस्थेचे अध्यक्ष प्रशांतदादा काटे, सचिव अशोक मोरे,उपप्राचार्य डॉ. संजय मोरे, कार्यालयीन अधीक्षक सुशील निंबाळकर, इतिहास अभ्यास मंडळाच्या अध्यक्षा डॉ. श्रद्धा कुंभोजकर, इतिहास मंडळाचे सदस्य डॉ. भूषण फडतरे,डॉ.दिनकर मुरकुटे डॉ. जगदीश सोनवणे, डॉ. अशोक कानडे, प्राचार्य डॉ. देविदास वायदंडे, प्राचार्य डॉ. नंदकुमार जाधव, प्रा. बाबासाहेब दूधभाते,डॉ. नितीन मोठे, डॉ. हनुमंत शिंदे, डॉ. शिवाजी माने, प्रा. सचिन कांबळे यांच्या बरोबरच सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या कार्यक्षेत्रातील विविध प्राध्यापक, प्राचार्य मित्रमंडळींनी प्राचार्य डॉ. प्रकाश पांढरमिसे यांचे अभिनंदन केले व पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा दिल्या.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!