मंजुळा बाई पवार पुरस्कृत *अनाथांची माय पुरस्कार-२०२२ या पुरस्काराने स्नेहछायाच्या माई सौ.सारिका इंगळे सन्मानित..

मंजुळा बाई पवार पुरस्कृत *अनाथांची माय पुरस्कार-२०२२ या पुरस्काराने स्नेहछायाच्या माई सौ.सारिका इंगळे सन्मानित..
पुणे – स्व. दादा कोंडके यांच्या 24 व्या स्मृती दिनी, दादा कोंडके मेमोरियल फाउंडेशन पुणे यांच्या वतीने दिला जाणारा सौ मंजुळा बाई पवार पुरस्कृत “अनाथांची माय पुरस्कार २०२२” देऊन स्नेहछाया परिवारातील लेकरांच्या माई सौ.सारिका इंगळे यांचा विशाल सह्याद्री भवन , टिळक स्मारक रोड,पुणे येथ ज्येष्ठ साहित्यिक ,विचारवंत व अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष डॉ. श्रीपाल सबनीस ,श्री राजेंद्र पवार (अधीक्षक अभियंता महावितरण पुणे ग्रामीण ) यांच्या शुभहस्ते व मान्यवरांच्या उपस्थितीत पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला.
यावेळी सौ.सुप्रिया शिंदे युवा शिल्पकार यांना “कलायात्री पुरस्कार” व सौ.अनिता राकडे यांना “सेवावृत्ती पुरस्कार” देऊन गौरविण्यात आले.स्नेहछाया परिवारास पुरस्कार मिळाल्याबद्दल प्रा.दत्तात्रय इंगळे यांनी दादा कोंडके मेमोरियल फाउंडेशन पुणे चे मुख्य विश्वस्त श्री मनोहरराव कोलते व विश्वस्त मंडळ यांनी सदर पुरस्कारासाठी पात्र ठरविले, यथोचित सन्मान केला, स्नेहछायास शिलाई मशीन व नवीन कपडे स्नेह भेट दिली त्याबद्दल त्यांचे आभार व्यक्त केले तसेच सदर पुरस्कार हा स्नेहछाया परिवारातील सर्व हितचिंतक, मार्गदर्शक व दाते मंडळी यांचा असून ,सदर पुरस्कार स्नेहछाया परिवारातील सर्वांना बहाल करण्यात येत आहे असे यावेळी स्नेहछाया परिवारचे सर्वेसर्वा प्रा.दत्तात्रय इंगळे यांनी बोलताना सांगितले.