शिवपुत्र छ.संभाजी महाराज राष्ट्रनिर्मीतीसाठी युवकांचे उर्जास्त्रोत व्हावेत: राहुल गिरी

शिवपुत्र छ.संभाजी महाराज राष्ट्रनिर्मीतीसाठी युवकांचे उर्जास्त्रोत व्हावेत: राहुल गिरी ——————————————————छ.संभाजी महाराजांच्या जयंतीनिमीत्त मौजे उंदरी ता.केज येथे भव्य व्याख्यानाचे आयोजन——————————————————
केज:- छत्रपती संभाजी महाराज यांच्या जयंतीनिमीत्त उंदरी ता.केज येथील सार्वजनिक जन्मोत्सव समीतीच्या वतीने महाराष्ट्राचे नामांकित युवा अभ्यासक व वक्ते मा.राहुल गिरी यांचे छ.संभाजी महाराज जीवनचरित्रपर व्याख्यान आयोजित केले होते.छत्रपती संभाजी महाराज यांचं एकूण जीवन जरी अल्पकालीन असलं तरी त्यांचा पराक्रम, त्यांनी निर्मीलेली ग्रंथसंपदा, त्यांचे राजव्यवहार इत्यादी बाबी शेकडो वर्षांचं जीवन जगणा-या अनेकांना लाजवणा-या आहेत.छत्रपती संभाजी महाराज हे जागतिक मानवजातीचं भूषण आहे. आज राष्ट्रनिर्मीतीसाठी तरूणांनी संभाजी महाराजांना उर्जास्त्रोत मानणे आवश्यक आहे. असे प्रतिपादन यावेळी बोलत असताना राहुल गिरी यांनी केले.छत्रपती शिवाजी महाराजांनी आदर्श जीवनाचा वस्तुपाठ घालून दिला तर छत्रपती संभाजी महाराजांनी राष्ट्रप्रेरणेने प्रेरीत मृत्यूचा अद्भूत आदर्श निर्माण केला. जगणं आणि मरणं शिकवणारी ही पिता-पुत्राची जोडी जगाच्या कुतूहलाचा विषय आहे. छत्रपती संभाजी महाराज हे पराक्रम, विद्वता, नितीमत्ता, निष्ठा, निर्भयता आणि रयतप्रेमाचा विलक्षण नमुना होते. असेही राहुल गिरी बोलत असताना म्हणाले.गावातील तरूण, आबालवृद्ध, महीला आदींची भरघोस उपस्थिती आणि उत्स्फूर्त प्रतिसाद याप्रसंगी राहुल गिरी यांच्या व्याख्यानाला जाणवत होता. उपस्थित जनसमुदाय मोठ्या कौतुकाने या युवा अभ्यासकाचे बोल कानांत साठविताना आढळत होता.यावेळी छावा संघटनेचे जिल्हाप्रमुख शिवाजी दादा ठोंबरे, नितीनजी साखरे सर यांसह अनेकांची उपस्थिती होती.आभार प्रदर्शनादरम्यान नितीन साखरे यांनी अशा कार्यक्रमांची प्रासंगिकता सांगून व्याख्यानाच्या यशस्वीतेवर शिक्कामोर्तब केले.राहुल गिरी यांचा यथोचित सन्मान देखील करण्यात आला.
यावेळी उद्धव ठोंबरे,महेश ठोंबरे,केशव ठोंबरे, सोमेश्वर गरडे ,महेश पतंगे ,नाना ठोंबरे ,समाधान ठोंबरे, किशोर ठोंबरे, विश्वास ठोंबरे , प्रशांत ठोंबरे,ज्ञानेश्वर ठोंबरे,चेतन ठोंबरे ,बापू ठोंबरे ,विलास ठोंबरे गुरुजी, किसन ठोंबरे गावकरी व महीला मोठ्या संख्या ने उपस्थित होते