जनता विकास परिषद औरंगाबाद च्या केंद्रीय सहसचिव पदी सुमंत गायकवाड यांची निवड

*जनता विकास परिषद औरंगाबाद च्या केंद्रीय सहसचिव पदी सुमंत गायकवाड यांची निवड*
माजलगाव: मराठवाडा जनता विकास परिषद औरंगाबाद च्या केंद्रीय सहसचिव पदी माजलगाव येथील सुमंत गायकवाड यांची निवड करण्यात आली आहे. मराठवाडा जनता विकास परिषद औरंगाबादचे केंद्रीय अध्यक्ष माजी खासदार डॉ. व्यंकटेश काब्दे यांनी तरुणांना संधी म्हणून बीड जिल्ह्यातून सुमंत गायकवाड यांची केंद्रीय सहसचिव पदी निवड केली आहे. मराठवाडा जनता विकास परिषदेचे मार्गदर्शक माजी शिक्षक आमदार डी. के.देशमुख, प्राचार्य डॉ. डी. एच.थोरात यांच्या मुळेच मला विकास परिषदेच्या केंद्रीय सहसचिव म्हणून काम करण्याची संधी प्राप्त झाली असे सुमंत गायकवाड यांनी सांगितले.सुमंत गायकवाड यांचा सामाजिक, शैक्षणिक व साहित्यिक चळवळीत नेहमीच सक्रिय सहभाग असतो त्याच बरोबर विकास परिषदेचे मार्गदर्शक माजी शिक्षक आमदार डी.के.देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली गेल्या अनेक वर्षांपासून विकास परिषदेचे तालुका सचिव,बीड जिल्हा सचिव म्हणून काम करतात नुकतीच मराठवाडा जनता विकास परिषदेची बैठक स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा संशोधन संस्था, औरंगाबाद येथील सभागृहात होऊन परिषदेच्या अध्यक्षपदी बिनविरोध माजी खासदार डॉ. व्यंकटेश काब्दे यांची निवड झाली आहे त्यांनी त्यांच्या अधिकारात उपाध्यक्षपदी लातूरचे डॉ. सोमनाथ रोडे,सचिवपदी प्राचार्य डॉ. जीवन देसाई तर कोषाध्यक्षपदी नांदेड येथील इंजि.द.मा.रेड्डी आणि सहसचिव पदी डॉ. मोहन फुले,सुमंत गायकवाड माजलगाव यांची निवड केली आहे.
सुमंत गायकवाड यांची मराठवाडा जनता विकास परिषद औरंगाबाद च्या केंद्रीय सहसचिव पदी निवड झाल्याबद्दल विकास परिषदेचे मार्गदर्शक माजी आमदार डी.के.देशमुख, प्राचार्य डॉ. डी. एच.थोरात,जिल्हाध्यक्ष राजेंद्र आगवन,शिरीषजी देशमुख डॉ. नरेंद्र काळे,संतोष मुळी, प्रा.डॉ. हरिदास विधाते, अविनाश वाघिरकर,सुहास देशमुख सौ.मयुरी राजहंस,श्रीमती रंभा शितोळे, सुहास काटे,अतुल कुलकर्णी, भास्करराव सरदेशमुख संतराम कराड,अनिल महाजन, प्रा.रमेश सोनवळकर,भाऊसाहेब जगताप,मंगेश निटूरकर,विजय शिनगारे,विश्वानंद तोष्णीवाल,सुरेश राजहंस,सूर्यकांत खेडकर,विजय जोशी,सुप्रिया जोशी यांनी अभिनंदन केले आहे