सामाजिक

शहाजीराजे भोसले यांच्या जयंतीनिमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन

शहाजीराजे भोसले यांच्या जयंतीनिमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन

बीड जिल्ह्यातील जनतेला वेरूळ येथे उपस्थित राहण्याचे आवाहन – शिवाजी दादा ठोंबरे

केज / दत्तात्रय मुजमुले स्वराज्य संकल्पक शहाजीराजे भोसले यांची 428 वी जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात येणार आहे.या मोहत्सवानिमित्त आज 17 मार्च रोजी सांयकाळी 6 वाजता वेरूळ येथील गढीवर दीप मोहत्सव कार्यक्रम तर 20 मार्च रोजी सकाळी 10 वाजल्यापासून उदघाटन समारंभ ,ध्वजारोहण आणि व्यख्याने आदी विविध कार्यक्रम होणार आहेत अशी माहिती छावा मराठा संघटना चे बीड जिल्हा प्रमुख शिवाजी दादा ठोंबरे यांनी पत्रकारांना बोलताना दिली.जयंतीचा कार्यक्रम गेल्या 19 वर्षांपासून जयंती उत्सव समितीचे संस्थापक अध्यक्ष किशोर चव्हाण व विलास भाऊ पांगरकर यांच्या मार्गदर्शनाखाली साजरा केला जात आहे. या मोहत्सवाचा शुभारंभ 20 मार्च रोजी सकाळी नागपूर घराण्याचे मुधोजीराजे भोसले यांच्या हस्ते होणार असून मोहत्सव समितीचे अध्यक्ष विजय घोगरे यांच्या हस्ते ध्वजारोहन होईल.या कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थानी जिल्हाधिकारी सुनील चव्हाण तर प्रमुख पाहुणे म्हणून केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉ. भागवत कराड ,राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे, पानिपत येथील मराठा उत्थान समितीचे अध्यक्ष मराठा रामनारायण,कर्नाटकमधील होदगिरी स्मारक समितीचे अध्यक्षवाय मलेश, आंध्रप्रदेश मधील सामाजिक समरसता संघटनेचे राष्ट्रीय सरचिटणीस कृष्णा किशोर उपस्थित राहतील. शाहीर सुरेश जाधव यांच्या पोवाड्याचा कार्यक्रम तसेच व्याख्याते गंगाधर बनमरे यांचे ‘स्वराज्याचे जनक : शहाजीराजे भोसले ‘ या विषयावर व्यख्यान होणार आहे .

चौकट स्वराज्याचे संकल्पक शहाजीराजे भोसले यांची जयंतीनिमित्त वेरूळ येथील गढीवर बीड जिल्हयातील मोठ्या संख्येने उपस्थित रहावे.—शिवाजी दादा ठोंबरे( छावा मराठा संघटना ,बीड जिल्हाप्रमुख )

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!