Uncategorized
ग्रामस्थांत भीतीचे वातावरण निर्माण !

अंबाजोगाई :- तालुक्यातील पुस – जवळगाव परिसरात विवेक आटोळे यांच्या शेतात बिबट्या दिसला असून त्याने एका शेळीचा फडशा पाडला असल्याची चर्चा रंगली आहे. या चर्चेमुळे परिसरातील ग्रामस्थांत भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.दरम्यान, बिबट्याचा वावर निदर्शनास येताच या भागातील ग्रामस्थांनी वनविभागाच्या अधिकाऱ्यांना याची दूरध्वनीवरून कल्पना दिली. घटनेचे गांभीर्य ओळखून अंबाजोगाईच्या वनपाल विजया शिंगोटे यांनी त्यांच्या पथकासह पुस – जवळगाव परिसराची पाहणी केली. तसेच ग्रामस्थांशी संवाद साधत बिबट्या दिसताच वनविभागाला कल्पना द्यावी, असं आवाहन केले. त्यासोबतच ग्रामस्थांनी शेतात जाताना सतर्कता बाळगण्याचेही आवाहन त्यांनी केले आहे.गुरुवारी रात्री अंबाजोगाई तालुक्यातील ममदापूर व पाटोदा या दोन गावच्या मध्यभागी लेंडी या शिवारात बिबट्या दिसला