कार्यक्षम आमदार म्हणून नमिता मुंदडा यांची अजित दादांकडे ओळख

केज :- नुकत्याच विधानसभेच्या निवडणुका पार पडल्या आहेत. त्यात केज विधानसभा मतदार संघातून नमिता मुंदडा यांनी सलग दुसऱ्यांदा बाजी मारली आहे.भारतीय जनता पार्टीच्या वतीने त्या दुसऱ्यांदा आमदार झाल्या आहेत.
विधानसभेचा निकाल लागताच त्यांनी मुंबई येथे महायुतीच्या नेत्यांची भेट घेतली आहे.राज्याचे मा.उपमुख्यमंत्री मा.ना.श्री.देवेंद्रजी फडणवीस, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष, राज्याचे मा.उपमुख्यमंत्री मा.ना.श्री. अजितदादा पवार, भाजपाच्या राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडे यांची अभिनंदनपर भेट घेतली.नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्षाने १३२ जागा जिंकत भाजपा हा राज्यातील सर्वांत मोठा पक्ष बनला आहे. याबद्दल महायुतीच्या नेत्यांचे अभिनंदन केले आहे.तसेच मुंदडा यांचा केज विधानसभा मतदारसंघातील विजयाबद्दल सत्कार करून शुभेच्छा दिल्या.
दरम्यान या भेटीने आ.नमिता मुंदडा ह्या राज्याच्या राजकारणावर आपली पकड मजबूत करत असल्याने दिसून येत आहे.