Uncategorized

मराठा समाजाला आरक्षण नसल्याने उघड्यावर आलेल्या मराठा समाजाचे अर्धनग्न आंदोलन

केज :- दत्तात्रय मुजमुले

आज दिनांक ९ सप्टेंबर २०२३ रोजी ढाकेफळ,कुबेंफळ,सारणी,जानेगाव,चंदनसावरगाव,बनकरंजा सह परीसरातील मराठा समाजातील युवकांनी मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी व जालना जिल्ह्यातील आंतरवली येथे मनोज जरांगे यांच्यासह मराठा समाजाच्या अबाल,वृद्ध,स्त्री-पुरुष यांच्यावर झालेल्या लाठीचार्जचा निषेध नोंदवण्याकरीता व मागील बारा दिवसापासुन मनोज जरांगे पाटील यांच्या सुरु असलेल्या आंदोलनाच्या समर्थनार्थ जिजाऊ ओद्योगिक नगर आण्णासाहेब पाटील चौक ढाकेफळ-कुबेंफळ या ठिकाणी चक्काजाम आंदोलनाची हाक दिली होती.

त्या हाकेला पाऊस सुरु असतानाही मराठा समाज बांधवांनी साद देत परीसरातील बांधवांनी बहुसंख्येने गर्दी केली होती.यावेळी प्रतिनिधीक स्वरुपात समाज बांधवाच्या भावना आवेग जोरदारपणे व्यक्त होत होता.यावेळी काहींनी अग्रक्रमाने उल्लेख केला की हैद्राबादच्या निझामाला मराठवाड्यातुन पळवल तेंव्हा कुणबी म्हणुन नोंदी असणाऱ्या समाजाला आरक्षणामुळे बुद्ध्यांक असुनही उघड्यावर येण्याची वेळ आहे,त्यामुळे आम्हाला उघड्यावर आणणाऱ्या राजकारण्यांच्या निषेध म्हणुन अर्धनग्न होऊन “छत्रपती शिवाजी महाराज की जय,एक मराठा लाख मराठा,आरक्षण आमच्या हक्काच” अशा जोरदार घोषणाबाजीने जिजाऊ औद्योगिक नगर परीसर दणाणुन सोडत आंदोलन करण्यात आले.या आंदोलनाच्या ठिकाणावरुन रुग्णवाहीकांना,रुग्णांना व परीक्षार्थींना रस्ता सोडत मराठा समाजाने माणुसकीचेही दर्शन घडवले.तसेच मराठा मनोज जरांगे पाटील यांच्यावर चित्रपट बनवणाऱ्या टिमनेही आंदोलनाची भेट देऊन आरक्षणाला पाठींबा दिला.त्याठिकाणी आंदोलनस्थळी उपस्थित असलेल्या एसपी मॅडमंना निवेदन देऊन आंदोलनाचा समारोप करण्यात आला.तसेच या चक्काजाम आंदोलनावेळी कायदा व सुरक्षेची जबाबदारी पोलीस प्रशासनाने चोखपणे पार पाडली.

यावेळी ढाकेफळ,कुबेंफळ,सारणी,जानेगाव,चंदनसावरगाव,बनकरंजा,लाडेगाव,नायगाव,उंदरी व केजसह परीसरातील मराठा समाज बांधवांनी मोठ्या संख्येने उपस्थिती होती

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!