नवनाथ दादा नढे पाटील आयोजित भव्य रास दांडिया व गरबा उत्सवाला उत्स्फूर्त प्रतिसाद

काळेवाडी :- जय मातादी फ्रेंड सर्कल व नवनाथ दादा नढे पाटील आयोजित भव्य रास दांडिया व गरबा उत्सवाला काळेवाडी व परिसरातील नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे मा. स्वीकृत सदस्य मा. श्री नवनाथ दादा नढे पाटील यांनी दरवर्षीप्रमाणे याही वर्षी विष्णुराज मंगल कार्यालय काळेवाडी या ठिकाणी शारदीय नवरात्र उत्सवानिमित्ताने भव्य रास दांडिया व गरबा खेळाचे आयोजन केले होते. दिनांक 15 ऑक्टोंबर ते 23 ऑक्टोंबर 2023 पर्यंत हा उत्सव आनंदी वातावरणामध्ये संपन्न झाला .या संपूर्ण नवरात्र उत्सवानिमित्ताने विविध उपक्रम साजरे करण्यात आले, तसेच विविध स्पर्धा, धार्मिक कार्यक्रम , शहरातील पत्रकारांचा सन्मान ,पोलीस कर्मचारी सन्मान ,महिला बचत गट सन्मान व उत्कृष्ट रास दांडिया व गरबा स्पर्धेमधून प्रथम, द्वितीय ,तृतीय स्पर्धकांना भेटवस्तू व महिलांना आकर्षक भेटवस्तू देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला , यावेळी संपूर्ण नवरात्र उत्सवामध्ये शहरातील व परिसरातील सामाजिक, धार्मिक, राजकीय व्यक्तींच्या हस्ते देवीची पूजा व आरती करून त्यांचा नवनाथ दादा नढे पाटील व जय मातादी फ्रेंड सर्कल यांच्याकडून सन्मान करण्यात आला .या नवरात्र उत्सवामध्ये प्रमुख उपस्थिती
पिंपरी चिंचवड शहराचे मा. विरोधी पक्षनेते नाना काटे, नगरसेवक संतोष कोकणे, विनोद नढे, उषामाई काळे, सामाजिक कार्यकर्ते मधुकर नाना काळे, अँड पांडुरंग थोरवे साहेब
विश्वस्त जेजुरी देवस्थान, शामराव काळे,संजय पगारे,किरण पन्हाळे
,शिवाजी काळे, रमेश नखाते,राजुभाऊ केदारी
,दिलीपआप्पा काळे
,तानाजी नढे, गजानन नढे
कु निखील नढे पाटील
मान्यवर उपस्थित होते.
नवनाथ दादा नढे पाटील युवा मंच, जय मातादी फ्रेंड सर्कल, अचानक मित्र मंडळ , ब्रह्मांड युवा प्रतिष्ठाण,विष्णूराज मित्र मंडळ,जिजाऊ महिला प्रतिष्ठाण यांचे संपूर्ण सदस्य व मोठ्या संख्येने काळेवाडी व परिसरातील नागरिकांनी नवरात्र उत्सवामधे भव्य रास दांडिया व गरबा खेळाचा आनंद घेतला , यावेळी नागरिकांमध्ये आनंदाचे वातावरण दिसून आले व संपूर्ण परिसरातील नागरिकांनी नवनाथ दादा नढे पाटील व जय मातादी फ्रेंड सर्कल चे कौतुक केले.