महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या 67 व्या महा परीनिर्वाण दिनानिमित्त रक्तदान शिबीर संपन्न

केज :- दत्तात्रय मुजमुले
माणसाला माणूस म्हणून जगण्याचा अधिकार प्राप्त करून देणारे महामानव, परमपूज्य,बोधीस्त्व डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या 67 व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त 6 डिसेंबर रोजी मौजे सुर्डी येथे भव्य रक्तदान शिबिर संपन्न झाले.
डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी आपल संपूर्ण आयुष्य समाजाच्या प्रगतीसाठी समाजासाठी व्यतीत केले अशा महामानवाचे अनंत उपकार भारतीय नागरिकांवर आठरा पगड जातीवर आहेत.ह्याच भावनेतून आणि विचाराने मौजे सुर्डी येथील तरुणांनी रक्तदान शिबिराचे आयोजन केले होते.या शिबिराचे उद्घाटन वंचीत बहुजन आघाडीचे युवा नेते अमरजीत ओव्हाळ यांच्या हस्ते करण्यात आले.तर प्रमुख पाहुणे म्हणून वंचीत बहुजन आघाडीचे जिल्हा प्रवक्ते ज्ञानेश्वर गिरी ,जिल्हा सचिव नीतीन बचुटे यांची उपस्थिती होती.या शिबिरात एकवीस रक्तदात्यानी रक्तदान केले.
शिबिराचे आयोजक रामेश्वर तंबारे, नितीन ओव्हाळ,आकाश तंबारे, रोहित बाळासाहेब ओव्हाळ, रमेश कसबे,आकाश सोनवणे,निलेश साखरे,कीशीर साळुंके,सूरज ईटकर ,दत्ता कणसे,रोहित ओव्हाळ यांच्यासह इतर तरुणांच्या सहकार्याने शिबीर संपन्न झाले.तर रेणुका ब्लल्ड सेंटर चे संजय शिंदे,प्रियंका तांबरे,वैभव गोरे,सुमित मुठाळ कर्मचारी उपस्थित होते.