Uncategorizedआरोग्य

घाणीच्या साम्राज्याकडे नगरपंचायतीचे दुर्लक्ष !

केजः/ वार्ताहर :-

केज शहरातील प्रभाग क्र. १६ मध्ये नाल्यांची वेळेवर सफाई केली जात नसून सांडपाणी रस्त्यावर साचल्याने घाणीचे साम्राज्य पसरले आहे. परिणामी, डास, मच्छराच्या उत्पत्तीमुळे आजारांना बळी पडावे लागत आहे. याकडे नगरपंचायतीच्या स्वच्छता विभागाचे दुर्लक्ष दिसून येत असून स्वच्छतेची कामे करावीत, अशी मागणी काँग्रेसचे शहराध्यक्ष ताहेर कुरेशी यांनी केली आहे.

केज शहरातील प्रभाग क्र. १६ मधील नाल्यांची वेळेवर सफाई केली जात नसल्याने नाल्या तुंबल्या आहेत. त्यामुळे सांडपाणी रस्त्यावर साचले असून घाणीचे साम्राज्य पसरले आहे. परिणामी, दुर्गंधी पसरली असून डास, मच्छराच्या उत्पत्तीमुळे डेंग्यू, चिकुनगुन्यासारख्या आजाराला नागरिकांना बळी पडावे लागत आहेत. त्यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले असून याकडे नगरपंचायतीच्या स्वच्छता विभागाने दुर्लक्ष केले आहे. त्यामुळे स्वच्छतेची कामे करण्यात यावीत, नवीन पाइपलाइन टाकून खड्डे बुजवावेत, खारी विहिरीत साठलेलेकेज येथे प्रभाग १६ मध्ये नाल्या तुंबल्या असून रस्त्यावर पाणी साचले आहे.घाण पाणी काढून स्वच्छता करावी,शांतिनगर भागात पाइपलाइनचे कामकरण्यात यावे.

अन्यथा २ जुलै रोजी नगरपंचायतीसमोर आमरण उपोषणास करण्यात असल्याचा इशारा काँग्रेसचे शहराध्यक्ष ताहेर कुरेशी यांनी नगरपंचायतीच्या मुख्याधिकाऱ्यांना लेखी निवेदनाद्वारे दिला आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!