मतदार संघासाठी दोन हजार कोटींचा निधी खेचून आणला:- आ.नमिता मुंदडा

केज :- प्रतिनिधी
केज विधानसभा मतदार संघाची आमदार या नात्याने मतदार संघाचं चौफेर विकास करण्यासाठी तब्बल दोन हजार कोटींचा निधी विविध विकास कामांसाठी खेचून आणला असल्याचे आ.नमिता मुंदडा यांनी नायगाव येथील प्रचारादरम्यान बोलताना सांगितले. स्व. विमल ताई मुंदडा यांनी केलेल्या विकासाचा आदर्श डोळ्यासमोर ठेऊन आजवर मतदार संघाच्या विकासासाठी कटिबध्द असल्याचे मत सौ.नमिता मुंदडा यांनी व्यक्त केले.
रस्ते विकास,धार्मिक स्थळांचा विकास,आरोग्य विषयक सुविधा,लाईटच्या समस्या सोडवण्याचा अविरात्र प्रयत्न आमदार म्हणून केला आहे.प्रचारादरम्यान विरोधकांकडून होत असलेल्या विधानांच्या टीकेलाही त्यांनी यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले.विकास हेच आमचे ध्येय आहे आणि पुढच्या काळात राहील असल्याची खात्री त्यांनी मतदारांना दिली.
यावेळी आ.नमिता मुंदडा,शरद इंगळे,धनेगावचे सरपंच मंगेश गुजर, यांच्यासह नायगाव येथील ग्रामस्थ,महिला,तरुण मोठ्या संख्येने उपस्थित होते.